Ticker

6/recent/ticker-posts

अहंकारी मनुष्याला भक्तीची प्राप्ती होत नाही... सुश्री देवी प्रियंकाजी



बुलडाणा :-सीता स्वयंवरामध्ये आलेले अनेक राजे अहंकारी होते जेव्हा श्रीराम खाली झुकले तेव्हा सीतामाईने रामाला हार घातला म्हणुन जे झुकतात त्यांनाच भक्तीची प्राप्ती होते. म्हणुन रावणा सारख्या मनुष्याला कधीच भक्तीची प्राप्ती होत नाही. कारण सीतामाई भक्तीचे प्रतिक होती, असे मौल्यवान प्रतिवादन सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित रामकथेमध्ये सुश्री देवी प्रियंकाजी यांनी सहावे पुष्प गुंफतांना केले. यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, अर्पिता शिंदे उपस्थित होते.


कथेच्या प्रारंभी स्व. डॉ. सुरेशचंद्र डागा व दामोधर बिडवे यांची कन्या जया बिडवे यांना भावपुर्ण श्रध्दांजली यावेळी वाहण्यात आली. त्यानंतर श्री. व सौ. डॉ. के. बी. शर्मा, श्री. व सौ. मधुकर गायके, श्री. गोकुळजी शर्मा, श्री. रतनलाल शर्मा यांनी देवीजींचे पुष्पहार घालून स्वागत केले. कथेचे मुख्य यजमान पंकज अग्रवाल, आनंद रतनलाल वर्मा, मनसुख यादव, बाळासाहेब वाघ, इत्यादींनी आपल्या धर्मपत्नीसोबत देवी प्रियंकाजी यांची पुजा व आरती करून रामकथेच्या सहावे पुष्पात प्रवेश केला. सीतामाईच्या बिदाईचा प्रसंग ऐकुन पुरुष व महिलांचे डोळे पानावले होते.


आज आरती व प्रसाद परशुराम ब्राम्हण समाज महिला तर्फे वितरीत करण्यात आला होता. पुढील प्रसंग विषद करतांना देवीजींनी सांगितले की, श्रीरामाने धनुष्य तोडल्यामुळे परशुरामजीला क्रोध आला तेव्हा लक्ष्मणाने प्रत्युत्तर दिले जेव्हा राजा जनकाने पृथ्वी शुरविराने रहीत झाली काय ? असा प्रश्न केला तेव्हा गुरुने रामाला धनुष्य तोडण्याचा आदेश दिला. धनुष्य मोडल्याने परशुरामाचा क्रोध शांत झाला. तेव्हा श्रीरामाने आपले खरे रूप प्रगट केले. क्रोध शांत झाल्यावर परशुरामाने श्रीरामाला आशिर्वाद दिला व राम विवाह सोहळा पार पडला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य कठोर परिश्रम घेत आहेत. सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ. सुकेशजी झंवर, चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, विजय सावजी, सुरेशचंद्र गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक, उमेश मुंधडा आदींनी परिश्रम घेतले. यावेळी तिलोकचंद चांडक यांच्या पुर्ण परिवाराने सर्व पंडीतांचे पुजा करुन दर्शन घेतले.


आजच्या उत्सवात केवट प्रेम प्रसंग सादर करण्यात आला. यामध्ये परशुराम समाज महिला मंडळाचे सदस्य व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रसाद वितरण सर्वांनी मिळून केले. यावेळी मनिषा शर्मा, गिता शर्मा, संगिता राजोरीया, वंदना पुरोहीत, मंजु शर्मा, सिमा राजोरीया, वैशाली जोशी, अर्चना वैष्णव इत्यादींनी विशेष सहकार्य केले. सौ. सोनाली अनिल गाढे यांना देवीजीनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.


यावेळी बुलडाणा 'अर्बन वेदविद्यालयाचे तेरा विद्यार्थी रामायण पाठाचे पंडीत आहेत. सदर रामायण हे नऊ दिवस दुपारी १ ते ५ या दरम्यान रामायण पाठ करतात. आजच्या सहावे पुष्पात राम, सीता, दशरथ, कौशल्या सीता स्वयंवरची झाँकी सोबत सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ.सुकेश झंवर,व समितीचे सर्व पदाधिकारी  सदस्य  हजर होते.

Post a Comment

0 Comments