Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. डॉ. संतोष हुशे यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार

vidarbhadoot santosh hushe


अकोला / प्रतिनिधी- केंद्र सरकारच्या निती आयोगाशी संलग्न मणिभाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीन देण्यात येणारा 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कारÓ यावर्षी अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक तथा विदर्भदूतचे मानद संपादक प्रा. डॉ. संतोष हुशे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. हुशे यांच्या सामाजिक प पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वल्लभभाई  पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात निमित्त पुणे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दि. 31 ऑक्टोबर रोजी सायं.5.30 वाजता मणिभाई मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक पदाधिकारी प्रबोधनकार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविन्द्र भोळे आणि त्यांच्या सहका:यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाला पुण्याचे आमदार महेश लांडगे, भिमराव अण्णा तापकीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अकोल्यातून संजय देशमुख, प्रा.  पुष्पराज गावंडे तर सातारा येथुन बाळासाहेब आंबेकर या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  

vidarbhadoot santosh hushe 1


केंद्र सरकारच्या निती आयोगाशी संलग्न मणिभाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने यावर्षी देण्यात येणा-या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्काराचे वितरण पुण्यामध्ये 31 ऑक्टोबर रोजी झाले. यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचेसह सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार, कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर तथा शासनाच्या साहित्य व सस्कती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, वर्धा येथील किशोर मुटे, व व्यंगचित्रकार शुभम बांगडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

vidarbhadoot santosh hushe 2


Post a Comment

0 Comments