Ticker

6/recent/ticker-posts

एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व : डॉ. दिलीप पाटील भुजबळ

कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूपासून सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली, शत्रू अदृश्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची शस्त्रे उपयुक्त ठरू शकत नाही. त्यामुळे ही लढाई कठीण असल्याची ज्यांना जाणीव झाली होती ते देवदूत म्हणजे पोलीस. तरीपण नागरिकांचे संरक्षण हेच आपले अंतिम ध्येय असल्यामुळे कोरोना आणि नागरिक यांच्यामधात हातात काठी घेऊन रस्त्यात उभे राहिलेल्या पोलिसांच्या कार्याला सलाम करावा तेव्हढा कमीच आहे. या देवदूतांवर कोरोना नावाचा शत्रू कधी, कुठे आणि कसा घाला घालेल हे सुध्दा सांगता येत नाही. कोरोना आपली जीवनयात्रा कुठेही संपू शकतो याची त्यांना जाणीव झाली आहे. तरीही कर्तव्यासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करण्याची त्यांची तयारी ही कौतुकास्पद बाब नव्हे का?
गेल्या तीन महिन्यांपासून पोलीसांची धावपळ, व्यस्त असणारी डयुटी,  तापणा:या उन्हात होणारी घामेजलेली अवस्था, कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तोंडाला बांधलेला मास्कमुळे होणारी अस्वस्थता, सर्वसामान्य लोकांकडून काही ठिकाणी झालेले पोलीसांवरील प्राणघातक हल्लयाच्या बातम्या ऐकून होणारी तगमग आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांना कोरोनाची बाधा तर होणार नाही ना अशी सतत शंका घेऊन कार्य करणा-या पोलीसांचे शारीरिक,मानसिक पातळीवर काहीना काही प्रमाणात खच्चीकरण होत नसेल का?  पण तरीही  फक्त आपल्याच रक्षणासाठी ते धैर्याने उभे आहेत.


बुलडाणा जिल्हयातील पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ सुरूवातीपासूनच जिल्हयातील पोलीसांच्या संरक्षणाच्या दृष्टीने तत्पर असल्याचे दिसून येत आहे. जनता कफर्यच्या वेळेलाच त्यांनी पोलीसांचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून बुलडाण्यात पोलीसांसाठी सॅनिटायर्झ कक्षाची निर्मिती केली. डयुटी केल्यावर सॅनिटायझर कक्षात जावून बाथ अंगावर घेतल्यामुळेे कोरोनाचे टेन्शन काही प्रमाणात तरी कमी झाल्याचे पोलिसांना जाणवत आहे. कोविड 19 च्या सर्वेचे  संवेदनशील भागात काम करण्या-या शिक्षकांनी सुध्दा या कक्षाचा उपयोग करून स्वत:चा  कोरोनापासून बचाव केला होता. इतकेच नव्हे तर पोलीस कर्मचा-यांसाठी त्यांनी मोबाईल सॅनिटायझर व्हनची सुध्दा सोय उपलब्ध करून दिली आहे. साहेबांच्या याच कर्तव्यदक्षतेमुळे जिल्हयात एकाही पोलीसाला कोरोनाची लागण झाली नाही. असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.डॉ. दिलीप पाटील-भुजबळ साहेबांनी माझे आरोग्य - माझी जबाबदारी ही मोहीम राबवून लोकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती केली. कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्यांनी नागरिकांना मीच माझा रक्षक हा मूलमंत्र दिला. सर्व लोकांनी जर स्वत:चेच रक्षण करण्याची जबाबदारी मनापासून स्वीकारली तर समाजात कोरोना पसरणारच नाही.म्हणूनच त्यांनी दिलेला मीच माझा रक्षक हा मूलमंत्र अत्यंत महत्वाचा ठरला आहे.


संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीसांना सहाय्य करण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी नेमण्याची पोलिस खात्याची योजना ही अत्यंत प्रभावी ठरली आहे. बुलडाणा जिल्हयात सुध्दा डॉ. भुजबळ साहेबांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणून 1100 पेक्षा अधिक नेमणूक केल्या.त्या मागे इतर नागरिकांना सुध्दा समाजसेवेची संधी मिळावी इतकेच नव्हे तर पोलिस खात्याचा कारभार कसा चालतो? याची जाणीव व्हावी. शिवाय त्यांचे पोलीसांना सहकार्य मिळाले तर  पोलीसांवरील कामाचा ताण सुध्दा कमी होवू शकतो हे सुध्दा डॉ. भुजबळ साहेबांना माहित होते.हे कार्य करतांना साहेबांनी विशेष पोलीस अधिका-यांना दिवसभरात आपण कोठे कोठे गेलो? कोणाकोणाला भेटलो? त्यांची दिनांकासह नोंद घेण्यासाठी एक डायरी दिली. म्हणजे आपल्याला जर कोरोना झालाच तर प्रशासनाला आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळविण्यास मदत होईल.सोप्या आणि कमी शब्दात यालाच कॉन्टॅक्ट टे्रसिंग म्हणतात.एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण ही सवय आत्मसात करायलाच हवी.हा पहिला हेतू होता तर दुसरा हेतू विशेष पोलीस अधिका-यांचे कोरोनापासून  सदैव रक्षण करणे हा होता.एसपीओना  दिलेली ही डायरी कोरोनाच्या संकटाची त्यांना  नेहमी जाणीव करून देत आहे.


दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच जात आहे. आज मुंबई पुण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे चार हजाराच्यावर आज पोलीस कोरोनाग्रस्त झालेले आहेत. तर 50 हून अधिक पोलीस कोरोनाशी दोन हात करताना शहिद झालेले आहेत. आज उदया हीच परिस्थिती बुलडाणा जिल्हयामध्ये  सुध्दा निर्माण होऊ शकते. कारण औरंगाबाद, अकोला आणि जळगाव या कोरोनाच्या बाबतीत गंभीर बनलेल्या जिल्हयांनी जणू काही बुलडाणा जिल्हयाला वेढलेच आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हयातील आपले रक्षणकर्ता असलेले पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी  कोविड सेंटरची निर्मिती केली पाहिजे असा विचार साहेबांच्या मनात सातत्याने येऊ लागला. मग साहेबांनी त्या दृष्टिने पावले उचलायला सुरूवात केली. कार्यवाही केली.त्याची फलश्रृती म्हणजे 3 जून रोजी 10 खाटांचे पोलीस कोविड सेंटरचे उदघाटन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खामगाव मध्ये केले. त्या पाठोपाठ 25 जून रोजी स्व.दिपक जोग स्मृती भवन बुलडाणा येथे जिल्हयातील दुस-या पोलीस कोविड सेंटर उदघाटनाचा मान पोलीस कर्मचारी पूजा राजपूत यांना देण्यात आला होता. त्यांनी कोरोना रेड झोनमध्ये असलेल्या अकोल्यात  जावून गुन्हाप्रकरणी चौकशी केली होती. आपल्या सहका-यांना प्रेरित कसे करावे याचे हे उत्तम उदाहरणच साहेबांनी सर्वांसमोर ठेवले आहे. याच सेंटरची पाण्याची आणि उपाहारगृहाची गरज दूर व्हावी म्हणून साहेबांनी उपाहारगृहाचे भूमिपूजन आणि तयार केलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजन मा.श्री.रविकांतजी  तुपकर यांच्या हस्ते करून घेतले. डॉ. भुजबळ साहेबांनी अथक परिश्रम घेऊन उभारलेल्या कोविड केअर सेंटरची गृहमंंत्री मा.श्री.अनिल देशमुख यांनी दखल घेऊन कौतुक केले.


पोलीस म्हटले की, त्यांचा संबंध ग्राउंडशी येणारच.पोलिस मुख्यालयासमोरील भव्यदिव्य मैदान पाहून डॉ.भुजबळ साहेब यांच्या मनात या मैदानाला चांगली रूपरेषा, आकार कसा देता येईल? या विचाराने वादळ उठवायला सुरूवात केली आणि आज त्या भव्यदिव्य मैदानाला एक सुंदर रूप साहेबांनी प्राप्त करून दिले. मैदानाचे पूर्वीचे रूप आणि आताचे रूप बघितल्यावर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रेरणा किल्याच्या  प्रतिकृतीची निर्मिती हे तर सर्वांच्याच आकर्षनाचे केंद्र बनले आहे.त्यामुळे जणू काही मैदानाला ऐतिहासिक वैभवच प्राप्त करून दिले आहे. याच तयार झालेल्या मैदानावर बुलडाण्याच्या आर.एस.पी अधिका-यांची पासिंग परेड सुध्दा उत्साहत पार पडली.ही बुलडाणेकरांसाठी एक उल्लेखनीय आणि अभिमानाची बाब आहे. बुलडाण्यात आर.एस.पी चळवळीचे रोपटे मा.पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ,शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे, महासमादेशक श्री. अरविंद देशमुख आणि बुलडाणा वाहतूक शाखेचे श्री.बी.आर.गीते साहेब यांनीच ख-या अर्थाने रूजविले. त्यामुळे आज बुलडाणा जिल्हयात 39 आर.एस.पी. शिक्षक अधिकारी कार्यरत आहेत. 

 

विशेष पोलीस अधिकारी म्हणून ते बुलडाणा जिल्हयात ठिकठिकाणी आपआपल्या परीने समाजसेवेचे कार्य करीत आहे. गोंदिया जिल्हयात या चळवळीचे यशस्वी बीजारोपण केल्यावर साहेबांनी बुलडाण्यात आर.एस.पी. चळवळीच्या निर्मितीसाठी  विशेष पुढाकार घेतला.तेही त्यांचे एक उल्लेखनीय कार्यच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही चळवळ लवकरच सर्वंत्र पसरेल यात शंका नाही. प्रशासकीय कामकाजाबरोबर अशा प्रकारचे विकासात्मक निणर्य घेऊन त्यांची अमंलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड करणा-या साहेबांसारख्या व्यक्ती सापडणे दुर्मिळच असतात. मग ते जुन्या शहर पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीत रूपांतर करणे असो की, पोलीसांच्या कार्यक्रमासाठी प्रभा भवन या प्रशस्त हॉलची निर्मिती वा सुशोभन करणे असो. 


साहेबांच्या याच अव्दितीय आणि अजोड कार्यामुळेच त्यांची उंची दिवसेंदिवस वाढत आहे.यात शंका नाही. साहेब हे शांत, संयमी आणि धीरगंभीर स्वभावाचे असल्यामुळे त्यांची कार्यपध्दती ही इतरांपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. बुलडाणा जिल्हयातील पोलीस दलाची कमान सांभाळण्यापूर्वी साहेबांनी  गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हयात सेवा दिली आहे. त्यांनी या भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे  कार्य उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडले म्हणून केंद्र सरकारने त्यांचा विशेष सेवा पदक देऊन सन्मान केला आहे. त्यापाठोपाठ त्यांना  फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड  2020  मिळाला आहे. असोसिएशन ऑफ फूड साइंटीस्टस अँन्ड टेक्नॉलॉजीस्टस् (इंडिया)या कर्नाटक येथील नामांकित संस्थेकडून साहेबांना नुकताच  शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.  जिल्हयाला असे कार्यक्षम, कर्तृत्वान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षकरी डॉ. दिलीप पाटील-भुजबळ साहेब यांच्या रूपाने लाभले हेच आपले भाग्य नव्हे का? ही संपूर्ण बुलडाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे यात शंका नाही.  

  
सुनील एस. कानडजे 

आर. एस. पी. अधिकारी बुलडाणा.

Post a Comment

0 Comments