प्रतिनिधी/15 एप्रिल
अकोला:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती यांच्या निमित्त अकोला महापारेषण अ ऊ दा संव सु विभाग अकोला अंतर्गत उपकेंद्र देखभाल उपविभाग, कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंबासमवेत मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमात बि एमआय, वजन, फॅट या सोनिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी आहार तज्ञ डॉ. दीपक सानप (अहिल्या नगर) वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन केले.
उपक्रमाचे आयोजन महापारेषण अ ऊदा सं व सु विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विनोद हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यविषयक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.” दरम्यान कार्यकारीअभियंता महा ऊर्जानिर्मिती पारस,सचिन डाखोडे, सहा. व्यवस्थापकविशाल वाघमारे ,तिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषन
विनायक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नेमीचंद चव्हाण उपकार्यकारी अभियंता यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री प्रफुल लहुडकर यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी व आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
0 Comments