Ticker

6/recent/ticker-posts

शेतीमधील यांत्रिकीकरणासह कापणी पश्चात मूल्यवर्धन साखळी गावोगावी निर्माण व्हावी :- प्रधान कृषि सचिव एकनाथ डवलेअकोला कृषि विद्यापीठातील संशोधन कार्याचा प्रधान कृषि सचिवांनी घेतला आढावा


विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल व्हिलेज उभारून शाश्वत ग्रामोद्धार साकारणार :- कुलगुरू डॉ. शरद गडाख


दिवसेंगणिक बदलत जाणाऱ्या परिस्थितीत ग्रामीण युवकांचे शहरांकडील स्थलांतर थांबवत फायदेशीर शेती व्यवसाय वाढीस लागणे काळाची गरज असून कौशल्यआधारित शेतीसह गावापातळीवरच यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर आणि मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यात कृषि विद्यापीठ, कृषि विभाग आणि संलग्न संस्थानी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे प्रधान कृषि सचिव श्री.एकनाथ डवले यांनी केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ भेटीसाठी ते नुकतेच अकोल्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठात आयोजित विशेष प्रक्षेत्र भेट व तदनंतर शास्त्रज्ञांशी सुसंवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. विदर्भातील शेती व्यवसायाला स्थैर्य देण्यासाठी हंगामी पिकांसह कोरडवाहू आणि संरक्षित ओलितांवर तग धरणारी फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात होत गाव पातळीवरच मूल्यवर्धन साखळी निर्माण होणे गरजेचे असल्याचे व याकरिता सहजतेने वापरण्याजोगे यंत्रे अवजारांची निर्मिती करण्याचे आवाहन कृषी अभियंत्यांनी स्वीकारावे असे देखील श्री एकनाथ डवले यांनी आपले मनोगतात सांगितले. अकोला कृषी विद्यापीठ द्वारे निर्मित पीक वाण व तंत्रज्ञान शिफारसी राज्यासह देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात स्वीकारत असून हा विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या कार्याचा गौरवच असल्याचे प्रतिपादन सुद्धा श्री डवले यांनी याप्रसंगी केले. 

तर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल व्हिलेज साकारत खऱ्या अर्थाने शाश्वत ग्रामोद्धार साकारणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व कामगार बंधू-भगिनी संपूर्ण क्षमतेने सेवारत असून राज्य तथा केंद्र शासनाचे माध्यमातून आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध होत असल्याने संशोधन तथा शिक्षणाचे कार्य जोमात सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. गडाख यांनी याप्रसंगी सांगितले. कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या सुसंवाद प्रसंगी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष आळसे, विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, प्रभारी कुलसचिव श्री संदीप गोगटे, संशोधन उपसंचालक डॉ. अजय सदावर्ते यांचे सह सर्व विभागप्रमुख शास्त्रज्ञ अधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments