Ticker

6/recent/ticker-posts

आई वडीलांपेक्षा जगात कोणीच मोठा नाही-सुश्री देवी प्रियंकाजी

Vidarbhadoot


बुलडाणा :"माँ बाप से बढकर जगत मे कोई नही दुजा, जिसने तुझको जन्म दिया है उसका दिल नही दुखाना" हे भजन गाऊन देवीजींनी सर्व श्रोत्यांना रडविले, म्हणुन आई वडीलांवर मनापासुन प्रेम करा असे प्रतिपादन रामकथेचे पाचवे पुष्प गुंफतांना केले. जेथे परमार्थ आहे तेथेच मानवता आहे, मनुष्य खुप स्वार्थी झाला सरडा जसे रंग बदलतो तसे रंग बदलतो,असे रामकथेच्या व्यासपीठावरुन देवीजी बोलत होत्या. सदभावना सेवा समिती द्वारा आयोजित रामकथेने आजच्या पाचव्या दिवसात प्रवेश केला.


कथेच्या प्रारंभी मुख्य यजमान पंकज अग्रवाल, दैनिक यजमान सागर जैस्वाल, उत्सव यजमान अमित महाजन, रवी राजपूत, 'यांनी पुजा आरती करुन स्वागत केले. लाला माधवाणी आणि अंजली परांजपे यांनी देवीजींचे स्वागत केले. 


आज श्रीराम विवाह सिता स्वंयवर असुन अग्रवाल सेवा समिती व महिला मंडळ यांनी पुज्य देवीजींना व्यासपीठापर्यंत फुलांचा वर्षाव करीत नेले. आजचा प्रसाद व आरती सुध्दा अग्रवाल सेवा समिती द्वारे वितरीत करण्यात आला.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत असल्यामुळे कार्यक्रम विशाल गर्दीत सुरु आहे. बुलडाणा अर्बनचे कर्मचारी, सिक्युरीटी गार्ड, पोलीसांचे सहकार्य व इतर समितींचे सहकार्य लाभत आहे. गणेश प्रिंटर्सचे मधुकर गायके, अॅड. राजेश लहाने, संदीप शेळके, ओम आनंद ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. चिखली विधान सभेच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी रामकथा मंडपाला धावती भेट देवून देवीजींचे हार घालून स्वागत केले. यावेळी अग्रवाल सेवा समितीचे किरण जुगल चिरानिया, कुसुम प्रदिप अग्रवाल, सपना पंकज अग्रवाल, माधुरी अग्रवाल, ज्योती भडेच, दिपीका अग्रवाल, सिध्दार्थ शर्मा तसेच अग्रवाल सेवा समिती यांनी सहकार्य करुन व्यासपीठा समोर आरती केली.

आज सिता स्वंयवरचा प्रसंग सादर करण्यात श्री प्रभु रामचंद्राने धनुष्य तोडून सितामाईने प्रभुला हार घातला यावेळी संपुर्ण मंडप सजावट करण्यात आली, वरात बॅण्डच्या जयघोषात वराती मंडळी सजुन धजून स्वंयवरात सामील झाले. सर्व यजमानांनी व्यासपीठ व झाँकीचे आरती करुन पुजन केले. सर्वांना गुळ फुटाणे व मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments