Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मणराव घुमरे,देवानंद पवार यांचे दिल्लीत निदर्शने

 


जानेफळ, विष्णू वाघ- 15 जून रोजी 24 अकबर रोड नवी दिल्ली येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर मा राहुलजी गांधी यांना इडी ने व मोदी शासनाने गैरप्रकारे चौकशीसाठी बोलावले. त्यांना तीन दिवसापासून त्रास देत आहे. त्याविरुद्ध संपूर्ण देशामध्ये व दिल्लीमध्ये जनाक्रोष उसळला असून मोठ्या प्रमाणत केंद्र शासनाच्या विरुद्ध घोषणा देऊन व निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये मा ना श्री सचिनजी पायलट माजी उपमुख्यमंत्री राजस्थान यांच्यासोबत तसेच आंदोलनामध्ये बुलढाणा यातून मा लक्ष्मणराव घुमरे माजी जिल्हाध्यक्ष बुलढाणा तसेच मा देवानंद पवार तालुका अध्यक्ष मेहकर यांनीसुद्धा निदर्शने केली व त्यांना सर्वांना दिल्ली पोलिसांनी अटक करून नरेला या दिल्ली सीमेवर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेले आहे 

    या पोलीस स्थेशन मध्ये दिल्ली येथील महिला कार्यकर्त्यांसह मा पायलट यांचेही मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आहेत.

Post a Comment

0 Comments