Ticker

6/recent/ticker-posts

अत्याचार करणाऱ्या सैनिकाला त्वरित अटक करा - रासप ची मागणी

 


लग्नाचे आमिष दाखवून वारंवार  अत्याचार करणाऱ्या सैनिका विरोधात गुन्हा दाखल होऊन महिना उलटल्या नंतरही अटक नाही.


मलकापूर/मनोज जाधव - लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणाऱ्या बुट्टी तालुका नांदुरा येथील रहिवासी सैनिक मंगेश तायडे याला त्वरित अटक करून अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षा करण्यात यावी या आशयाचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील  राहणाऱ्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बुट्टी येथील मंगेश तायडे या सैनिका सह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिना उलटून ही सदर आरोपी ला अद्यापही पोलिसांना अटक करण्यात यश आलेले नाही.

    आरोपींच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु पोलिस थातूरमातूर कारवाई करून आरोपीला अटक करण्याचे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे लक्षात येते. अत्याचार प्रकरणातील आरोपीला महिना-महिना अटक होत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

         या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश तायडे याला त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून कोणत्याही मुली व महिलांसोबत अशा प्रकारचे घटना यापुढे भविष्यात घडणार नाही.

आरोग्य मंगेश तायडे ला त्वरित अटक न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा यावेळीराष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी दिला. सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप, प्रकाश थाटे जिल्हा संघटक रासप, गणेश झनके तालुका अध्यक्ष मा सेल, सैय्यद ताहेर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी, वानखेडे शहराध्यक्ष रासप इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत

Post a Comment

0 Comments