Ticker

6/recent/ticker-posts

कव्हळा येथील शेतकऱ्यांना रयतच्या माध्यमातून तात्काळ खत उपलब्ध

 


चिखली / मनोज जाधव /- रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या माध्यमातून कव्हळा,शेलूद येथील शेतकऱ्यांना तात्काळ रासायनिक खत उपलब्ध करून दिले.

दि.६ जून रोजी शेलुद येथील शिवाजी शिराळे पाटील व कव्हळा येथील भागवत डाळींबकर,गणेश लांडे,राम चिरखे,राम जाधव आदी शेतकरी चिखली येथील शिवाजी चौकातील एका कृषी सेवा केंद्रावर खत खरेदी करण्यासाठी गेले असता सध्या खत उपलब्ध नसल्याचे दुकानदाराने शेतकऱ्यांना सांगितले परंतु त्या ठिकाणी खताचा ट्रक खाली करणे सुरू असून खत देण्याची विनंती शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे केली असता आम्हाला ऑनलाइन नोंदी झाल्याशिवाय खत देता येणार नाही व हवं असल्यास पाच बॅग खत एका शेतकऱ्यांना देता येईल व त्यासोबत इतर खत देखील पाच बॅग घ्याव्या लागतील व ते  देखील उदयाला खत मिळेल आज मिळणार नाही असे शेतकऱ्यांना सांगितले असता शेलूद येथील शिवाजी शिराळे यांनी रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा केली असता त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी शिंदे यांच्याशी सँम्पर्क साधून तात्काळ कृषी विभागाचे अधिकारी सदर कृषी सेवा केंद्रावर पाठवून शेतकऱ्यांना आनावश्यक खत नको असल्याने हवं तेच खत तात्काळ देण्यास प्रशांत पाटील यांनी सांगताच कृषी विभागाचे लहाने साहेब यांच्या समक्ष लगेच कव्हळा व शेलूद येथील शेतकऱ्यांना हवं असलेलंच खत प्रत्येकी दहा बॅग तात्काळ उपस्थित शेतकऱ्यांना दिल्या सदर शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील मदतीला धावून आल्याने त्यांचे आभार व्यक्त केले असता कुठल्या ही शेतकऱ्यांना खता संदर्भात अडचणी असल्यास निःसंकोचपणे संपर्क करा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी चोविस तास उपलब्ध  राहू असे रयत क्रांती संगटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments