Ticker

6/recent/ticker-posts

वसीम चौधरी चे अश्लील चाळे, मुलीशी करायचा अश्लील संवाद, तिला बोलावले खोलीवर आणि केले अश्लील चाळे, पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

 

Vasim akola

अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी समोर आल्याने आता तक्रारींचा ओघ वाढणार असल्याचे सूत्रांकडून कळते. अकोला शहरातील वसीत चौधरी कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम चौधरी यांनी एका मुलीसोबत नकोति हरकत केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून या बाबतीत सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वसीम चौधरी हा एका मुली सोबत मोबाईल फोनवर अश्लील संवाद करीत होता. तसेच एके दिवशी त्या मुलीला खोलीवर बोलवून तिच्याशी नको ते चाळे करण्याचा प्रयत्न त्याने केला असल्याचे सदर पीडित मुलीने पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वीही अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती आहे. त्याबाबत सदर पीडित मुलींनी शैक्षणिक नुकसान नको म्हणून वसीम चौधरी विरोधात कधीही तक्रार दिली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु या मुलीने वसीम चौधरी याच्या वारंवार वारंवार त्रास देण्याच्या प्रयत्नाला कंटाळून अखेर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने ही स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वसीम चौधरी क्लासेस येथे मोफत विद्यार्थ्यांना शिकवण्याची सोय करून देण्याची देण्याचा खटाटोप केलेला आहे. आणि आता वसीम चौधरी क्लासमध्ये या घटनेने मात्र जिल्हा प्रशासनावर सुद्धा नाचक्की येणार आहे.

 तक्रारी वाढणार

 आज एका मुलीने सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे तक्रार दाखल केली परंतु असाच प्रकार इतरही मुलींच्या सोबत घडला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे  आता सर्वच मुली जागृत झालृया असून पालकही सतर्क झाले आहेत. त्यामुळे अनेक तक्रारी दाखल होतील अशी माहिती मिळत आहे.


 आता याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन येथे रविवारी रात्री पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वसीम चौधरी  याला तातडीने अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत. या सोबतच सायबर विभागाकडे सुद्धा तपास सोपविण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments