Ticker

6/recent/ticker-posts

निमगाव वायाळ बनले संबधित कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताचे अवैध रेती उपसा केंद्र...! - मनोज जाधव

 


 बुलडाणा/ मनोज जाधव  - मा. उपविभागीय अधिकारी  व स्थानिक तहसीलदार साहेब यांना रेती उत्खनन बाबत पुराव्यासहित लेखी तक्रार दिली होती, परंतु मा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब कार्यालय सिंदखेडराजा यांनी  कंत्राटदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. असे लक्षात येताच दिनांक 02/05/ 2022 रोजी मा. संबंधित अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले होते, तरी सुध्दा कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही यावरून असे दिसून येते की महसूल कर्मचारी व संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदार यांच्यात "दालमे कुछ काला आहे " असेच म्हणावे लागेल. निमगाव वायाळ या रेती घाटामध्ये जे.सी.बी.व पोकलँड च्या साह्याने मोठ-मोठाले रेतीचे ढीग घालून  आणि  शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन व अवैध रेती उपसा करून चार ब्रास च्या गाडीला दोन पावत्या देण्यात येतात परंतु त्यामधे दुप्पट रेती वाहतूक केली जाते. म्हणजेच पन्नास टक्के  अधिकचा  महसूल संबधित ठेकेदार बूडवत आहे. जे.सी.बी. व पोकलँड चा वापर केल्यामुळे मजुरावर सुद्धा उपासमारीची वेळ येत आहे .याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन शासकीय कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी विदर्भदूत जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी  मा.जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आहे, जर योग्य ती   कारवाई न केल्यास जिल्हाभर धरणे आंदोलन करण्याचा इशारा  त्यांनी दिला.Post a Comment

0 Comments