Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक कीर्तीच्या भारतातील महान अनाथांच्या सेविका,मदर तेरेसा यांचा खरा वारसा चालविनाऱ्या जागतिक समाज सेविका सी, लुसी कुरिअन यांच्या बुलडाणा दौऱ्या निमीत्त चिखली येथे भेट

 


चिखली / मनोज जाधव - मुद्रा लिमिटेड चे एम. डी. मा. सुभाष राजपुत ( राष्ट्रवादी - पश्चिम विदर्भ संपर्क  प्रमुख ) यांच्याकडून सी लुसी कुरियन व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत व माहेर ट्रस्ट च्या सामाजिक कार्याला आर्थिक मदत. 



मदर तेरेसा, बाबा आमटे, गाडगे महाराज यांनी समाज सेवा करून जगात प्रसिद्धी मिळवली , जगातील 100 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या यादीतील 18 व्या क्रमांकाच्या सी लुसी कुरियन ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून सन्मानित व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांच्या महिला व अनाथांच्या अभुतपुर्व कार्याची दखल घेत गौरविण्यात आले होते,

वढू बुद्रुक येथे रात्रीच्या वेळी एका महिलेला आश्रय देऊ न शकल्याने पतीकडून जाळून हत्या करण्यात आली होती या दुःखद घटनेने प्रेरित होऊन समाजातील अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त, विधवा, परितक्त्या, अनाथ, अजारग्रस्त महिलांसाठी सेवा कार्य करण्याची जिद्द बाळगून सन. १९९७ मध्ये वढु बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे माहेर नावाची संस्था स्थापन करण्यात आली, निस्वार्थ सेवेचा ध्यास असल्याने समाजातील दान शुर व्यक्तींचे सहकार्य लाभल्याने सी लुसी कुरियन यांनी पंचविस वर्षापूर्वी लावलेलं समाज कार्याचं छोटंसं रोपटं वटवृक्षात बदलून गेलं आज माहेर संस्थेच्या महाराष्ट्रातच नव्हे तर केरळ, कर्नाटक ,आंध्र प्रदेश, कोलकत्ता, येथे विस्तारीकरण झाल्याने माहेर संस्थेच्या 63 उपशाखा व 25 प्रकल्प आहेत ज्या मध्ये शेकडो अनाथ मुलं शिक्षणासह नृत्त, गायन, वादनाचे धडे घेऊन आत्मनिर्भर होत आहेत, अत्याचारित, अन्याग्रस्त, विधवा, आजारग्रस्त महिलांना माहेर च्या आश्रमात आश्रय दिल्या गेला आहे, अनाथ मुलींचे संगोपन करून त्यांना शिक्षणासह कला गुण शिकवून  आत्मनिर्भर करीत आजपर्यंत १८८ मुलींचे लग्न करण्यात आले.  ज्यांच्या जीवनातील एका घटनेने त्यांचे पुर्ण आयुष बदलून टाकले व त्या हजारों अनाथांच्या आई बनल्या शेकडो मुलींचे लग्न लावले, हजारों महिला त्यांच्या आश्रयात आनंदाने जगत आहेत अश्या भारताच्या मदर तेरेसा सी लुसी कुरियन यांच्या आश्रम ला चिखली शहराचे सुप्रसिध्द व्यवसायिक, सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व असलेले मुद्रा लिमिटेड चे एम. डी. मा. सुभाष राजपुत यांनी भेट दिली व जिल्हा दौऱ्याचे निमंत्रण दिले आज चिखली शहरात सी लुसी कुरियन यांच्या आगमन प्रसंगी सुभाष राजपुत (  राष्ट्रवादी -पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ) यांच्या कार्यालयात सपत्नीक सी लुसी कुरियन यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी चिखली मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी भेट घेतली. आणि त्यांचे  स्वागत केले, या वेळी उपस्थित कृष्ण कुमार सपकाळ, अमोल ढोरे, सुरेश इंगळे, समाधान गाडेकर , राजेश बिडवे,गजानन गाडेकर, संजय गाडेकर, डॉ. प्रतापसिंह परिहार, डॉ, राजपूत, डॉ, पांढरी इंगळे, डॉ, प्रभू इंगळे मनोज जाधव  (विदर्भदूत जि. प्रतिनिधी भा, ज,पा,  गजानन मोरे,बुलडाणा)  बिदेसिंग इंगळे,(काँग्रेस) आदी  उपस्थित होते. त्यांचा सत्कार माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या अनुराधा बँकेमध्ये सुभाष राजपूत , व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला . नंतर दीदी आणि राहुल बोन्द्रे यांची चर्चा झाली  दीदी ने केव्हापासून समाज सेवेचा विडा हाती घेतला. एवढं मोठं कार्य करत असताना कशा प्रकारे संकटाना सामना  करावा लागला. समाजिक, चर्चा खूप वेळ चालली .दीदी  च्या कार्याची दखल घेऊन राहुल बोन्द्रे यांनी २१,००० रुपयाची संस्थेला मदत दिली. संस्थेची माहिती देत असताना 

लुसी सी कुरियन यांनी माहेर संस्थेच्या प्रगतीसाठी विश्वस्त (अध्यक्ष) मा. हिरा बेगम मुल्ला, (सचिव) डॉ निकोला पवार, (संचालिका) सी लुसी कुरियन, डॉ प्रदीप के, शर्मा. मर्सी मेंडोसा, अनिरुद्ध गंडकुश, योगेश भोर, यांची अथक परिश्रम व सेवा भावना महत्वाची ठरली.

Post a Comment

0 Comments