Ticker

6/recent/ticker-posts

सैलानी यात्रेला परवानगी नाही-दिनेश गीते, प्रशासनाचा निर्णय

sailani buldhana yatra


बुलडाणा- जिल्ह्यात देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेला याहीवर्षी शासनाच्या निर्बंधांनुसार परवानगी देण्यात आली नाही. त्यानुसार यात्रा होणार नाही. तरी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी येवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी केले आहे. 
   जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली सैलानी बाब यात्रा समन्वय समितीची पूर्वनियोजन सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 

   ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र जिल्ह्यात अजून अपेक्षित लसीकरण झाले नाही. शासनाने ९० टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी पहिला डोस आणि ७० टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी दुसरा डोस घेतलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र  जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्याने याहीवर्षी सैलानी यात्रा होणार नाही, असेही दिनेश गीते यांनी स्पष्ट केले. यावेळी  जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, सैलानी बाबा समितीचे अध्यक्ष अ. समद, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रायलवार, तहसीदार रूपेश खंडारे, सैलानी येथील मुजावर शे. चाँद, शे. शफीक यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दर्शन यात्रा जरी भरवली गेली तरी मोठ्या प्रमाणत नागरिक सैलानी येथे होळीच्या पूर्वीपासून येतात.  तसेच संदल संपल्यानंतर हे नागरिक जातात.  यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तरी प्रशासनाने दर्गा बंद ठेवावा, याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सैलानी येथील श्री  मुजावर यांनी देखील आपली भूमिका विषद केली. 

Post a Comment

0 Comments