Ticker

6/recent/ticker-posts

आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना वृद्धिंगत करा : सुचिता पाटेकर




स्नेहसंमेलनाने सांघिक भावना वाढीस लागते : कुलगुरु डॉ. विलास भाले 

कृषी महाविद्यालय अकोला येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने पद्धतीने 63व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन!




अकोला- महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येक पदवीधराच्या आयुष्याला कलाटणी देणारं तथा भविष्याचा वेध घेणारं असल्याने चांगल्या संगतीसह संस्कारक्षम आचार विचार आणि कृतियुक्त शिक्षणाचे सक्षम साथीने मी समाजाचं देणं लागतो ही भावना अधीक विकसित करीत समाजसेवेचे व्रत कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अंगीकारात ग्रामीण भारत भक्कम बनवावा असं भावनिक व तितकेच वास्तविक आवाहन जिल्हा परिषद अकोल्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक सौं.सुचिता पाटेकर यांनी केले.कृषी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा आयोजित तीनदिवसीय विद्यार्थी स्नेहसंमेलन "मृदगंध 2022" च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. 

आपल्या अतिशय प्रेरणादायी आणि ओघवत्या शैलीत युवा मनाचा ठाव घेत चौ पाटेकर यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना भविष्यातील येणाऱ्या संकटांचा आव्हानांचा स्वीकार करीत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरवशावरच भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे तथा जीवनात आदर्श ठरवितांना सर्वप्रथम अंतर्मनाचा आवाज ऐकत विचाराला कृतीची आणि सातत्याची जोड देत महाविद्यालयीन जीवन म्हणजे जीवन जगण्याची पाठ शाळाच असल्याचे उपस्थिताना  सांगितलं.  आयुष्यात ताण-तणावाचे व्यवस्थापन करीत प्रत्येक प्रश्नाला उत्तर नक्कीच आहे हा आत्मविश्वास जागृत करण्याचे भावनाप्रधान आवाहन सुद्धा सौ सुचिता पाटेकर यांनी आपल्या संदेशात केले. तर कोरोना महामारी च्या काळात संपूर्ण जग बंदीस्त असताना केवळ शेती आणि कृषी संबंधित संस्था रात्रंदिवस कार्यरत होत्या आणि देशाच्या एकूण सकल उत्पन्नात कृषीचा वाटा वाढतो ही भविष्यातील शेतीला आणि पर्यायाने कृषी पदवीधरांना आशादायक बाब असल्याचे सांगताना विद्यापीठाचे कुलगुरू तथा उद्घाटन सत्राचे अध्यक्ष मा. डॉ. विलास भाले यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात कृषी पदवीधरांना भविष्यातील रोजगार, स्वयंरोजगारासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक आणि सेवेच्या संधी अवगत करून दिल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करताना शालेय शिक्षणात कृषी चा समावेश ही कृषी पदवीधरांसाठी आणि एकंदरीतच देशांतर्गत शेती व्यवसायासाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे सांगत डॉ. भाले यांनी कृतीयुक्त शेतीचे धडे शालेय जीवनापासूनच गिरवील्यास रोजगारासह सकस अन्नधान्य निर्मिती आणि पर्यायाने परकीय चलनाची प्राप्ती आपल्या देशाला कृषिप्रधान असल्याचं भूषणच ठरणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. 



स्नेहसंमेलनाचे माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागत असल्याचे सांगताना डॉ. विलास भाले यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक प्रसंग उपस्थित विद्यार्थी वर्गाला सांगत  अभ्यासासोबतच खेळकुद, वाचन, गायन किंवा इतर छंद जोपसण्याचे आवाहन केले. कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय क्रमवारीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मानाचे स्थान प्राप्त केले असून भविष्यात कृषी महाविद्यालय अकोला इतर सर्व कृषी महाविद्यालयांसाठी आदर्श ठरेल अशी सांघिक कामगिरी सर्वांनीच करावी असे आवाहनही याप्रसंगी केले.

कृषी महाविद्यालय अकोला येथे  तीन दिवसीय दि. 23,२४ व २५  मार्च दरम्यान आयोजित या वार्षिक संमेलनाचे उदघाटन प्रसंगी अधिष्ठाता कृषि डॉ. वाय. बी.तायडे , डॉ. एस एस. माने सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला, डॉ के. जे. कुबडे (संचालक विद्यार्थि कल्याण), सेक्रेटरी जिमखाना डॉ. एम. व्ही. तोटावर, स्नेहसंमेलन आयोजक सचिव डॉ. एस.पी लांबे, तसेच कृ. म.  महाविद्यालय अकोला सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थि प्रतिनिधि शिवराज गीते व विद्यार्थीनी प्रतिनिधि कांचन धूर्वे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कृषि महाविद्यालय अकोला चे विद्यार्थी सौरव गायकवाड, अरविंद पवार, कुणाल ठेंग, वैभव उगले, गोपाल उगले, जीवन सोळुंके या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक ऑनलाइन संकेतस्थळ कृषी ज्ञान या नावाने चालू केले आहे. या संकेतस्थळाची लॉन्चिंग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम भाले यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, शेती संबंधित लेख व बातम्या, हवामान अंदाज, शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान अशा प्रकारची माहिती त्वरित शेतकऱ्यांच्या मोबाईल कृषी ज्ञान या संकेतस्थळावर प्राप्त होईल. व या सर्व गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होईल, हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. असे मत त्यावेळी सौरव गायकवाड या विद्यार्थ्यांने सांगितले. 

अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे तथा सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला डॉ. श्याम सुंदर माने यांनी सुद्धा प्रासंगिक मार्गदर्शन केले. तर विद्यार्थी प्रतिनिधी शिवराज गीते याने कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाचे विद्यार्थी ऋत्विक टाले व संध्या सावंत यांनी केले तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील महत्वाचे सबंध यावर एक संगीत नाटिका सादर केली. तसेच कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन मयुर बोरगावकर याने केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शेटवच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. गेल्या तीन ते चार  दिवसांपासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन व इतर मैदानी खेळांचे व त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा (१८ विद्यार्थी) , वादविवाद स्पर्धा (१२ विद्यार्थी) , उत्स्फूर्त भाषण (११ विद्यार्थी),  फोटोग्राफी (३८ विद्यार्थी), बुद्धिबळ (३५ विद्यार्थी) स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments