Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासकीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवणारा आश्वासक चेहरा : निलेश तायडे

Nilesh Tayade DIO Buldhana Vidarbhadoot newspaper


ना किसी से ईर्ष्या,ना किसी से कोई होड़...

मेरी अपनी है मंजिल, मेरी अपनी दौड़...!
... 'निलेश' या नावांतच निश्चल असा निळाशार,निर्मळ आणि स्वच्छप्रतिमेचे काही व्यक्तिमत्व उठवून दिसत.अशाच व्यक्तिमत्वापैकी मना मनाला अविरत आनंद देणारा,मानवी मनाची मरगळ दूर करून चैतन्य निर्माण करणारा, प्रशासकीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवणारा आश्वासक चेहरा आज बुलढाणा जिल्हात सहायक माहिती अधिकारी म्हणून निलेश तायडे साहेब कार्यरत आहेत.प्रबळ इच्छाशक्ती असली की कोणतेही ध्येय अवघड नसते हे अनेकांचे व्यक्तिमत्व पाहिल्यास समजते.पण असे कांही व्यक्तिमत्व असतात की त्यांचा सध्याचा हुद्दा फक्त आपणास दिसतो पण त्या व्यक्तीचा संघर्ष काय असतो हे त्या व्यक्तीला समजून घेतल्या शिवाय समजत नाही.असेच एक व्यक्तिमत्व मला भेटले व त्यांच्याबद्दल लिहण्याची इच्छा झाली.अशा व्यक्तींच्या अंगी निष्ठा, प्रामाणिकपणा अन् सर्वसामान्य घटकांसाठी काम करण्याची असलेली अंगभुत वृत्ती व तळमळ त्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच असते.ही व्यक्तिमत्त्वे जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत असतात . किंबहुना समाजाच्या मदतीसाठी आधार ठरत असतात.जनहित माहिती क्षेत्रातील अनेक प्रश्नांना योग्य प्रकारे न्याय देऊन सर्वसामान्यांना न्याय देऊन दिलासा देत त्यांच्या गालावर आनंदाचे हसू उमटवणारे ही व्यक्तिमत्त्व आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे आश्वासक ठरतात.निष्ठा, प्रामाणिकपणा , वंचित घटकांसाठी काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हीच त्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारी ठरते.अफाट कष्टातून घडलेली माणसे कोणत्याही संकटात ठामपणे उभी असतात. कारण त्यांच्या कष्टाला मातीचा सुगंध असतो. अशी माणसे आपल्या कतृत्वाने मोठी होतात. त्यांचे व्यक्तिमत्व आभाळा इतक्या उंचीचे बनते. मात्र, त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. कारण त्यांचे ऋणानुबंध कायम मातीशी जुळलेले असतात. आपल्या माणसांशी जुळलेले असतात. अशी माणसे समाजात फार हाताच्या बोटाने मोजण्याइतकी असतात. प्रेमळ स्वभाव,सामाजिक दायित्व सांभाळणारे एक संयमी असे निलेश तायडे व्यक्तिमत्व आहे. अफाट कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणाच्या जोरावर साहेबांनी बिकट परिस्थितीला नमविले. आयुष्यभर कष्ट सोसले, पण शिक्षण थांबविले नाही. कोणत्याही कामाला कमी न लेखता कष्टाची अनेक कामे प्रामाणिकपणे केली केली.

बुलढाणा जिल्हातील मलकापुर तालुक्यातील दाताळा येथे सर्वसामान्य कुटुंबात दि.२४ मे १९८५ रोजी जन्मास आलेले सहायक माहिती अधिकारी निलेश तायडे यांनी खडतर प्रवासातून परिस्थीतीमुळे आलेला न्यूगंड दूर सारत मोठ्या उमद्दीने,जिद्द,चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावर पुणे शहरात शिक्षण पुर्ण करुन पारंपरिक करिअच्या पाऊलवाटा न धुंडाळता पत्रकारीते सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे ठरविले.पत्रकारीतेत करिअर करता करता त्यांची धडपड ओळखून त्यांना दैनिक वृत्तपत्रात उपसंपादक पदावर संधी मिळाली,आपल्यावर दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावण्यासाठी  हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता असावी,असा त्यांचा कटाक्ष असे. अनेकांना आपल्या कार्यात, उपक्रमात सामावून घेतले.सोबतच लोकाभिमुख कार्यपद्धतीने उपक्रम राबविले.वृत्तपत्राचे उपसंपादक,सहसंपादक, वार्ताहर, विविध पदावर काम करत असतानात्यांना आपल्या कार्यकाळात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. मानसिक त्रासही सहण करावा लागला.यामुळे संघर्षाचे प्रसंग पेलणे त्यांना कठीण गेले नाही.त्यांच्या पत्रकारितेचा पाया रचला जात असताना त्यांना बाहेरील जग खुणावत होते. यांच्या लेखन आणि कार्यशैलीचे संस्कार त्यांवर होत होते.चौकस,अभ्यासू व जिद्दी स्वाभवामुळे आव्हानात्मक क्षितिजे त्यांना खुणावत होती.त्यामुळे सन:२०१३ मध्ये माहिती विभागात पहिली पोस्ट अमरावती येथे सहायक माहिती अधिकारी म्हणून निवड झाली.

त्यामुळे आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला. सरकारी योजनांचा अभ्यास करून त्या लोकांपर्यंत विविध माध्यमांतून पोचविल्या. सरकार व जनता यामधील दुवा सरकारी अधिकारी असतो हे त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने सर्वसामान्य जनमानसावर बिंबवले.आज बुलढाणा जिल्हात सहायक माहिती अधिकारी या पदावर सध्या कार्यरत आहेत.येथे आपल्या कामाच्या अनुभवातून संपुर्ण जिल्हात दांडगा जनसंपर्क तयार झाला.लोककल्याणकारी योजनांचा अर्थ लावून लोकांपर्यंत त्या कशा पद्धतीने पोचतील यासाठी प्रयत्न करणे, आपल्या सहकार्‍यांना मदतीस घेऊन त्या पूर्णत्वास नेणे या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या.नोकरशाही समाजभिमुख रहायला हवी, असे म्हणून चालत नाही तर ती दिसायला हवी. एक संवेदनशील अधिकारी आपल्या मूळच्या पत्रकारितेच्या पिंडाला कसा न्याय देऊ शकतो, हेच सहायक माहिती अधिकारी निलेश तायडे साहेब यांच्या रूपाने दिसून येतेे.

आपल्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात अधिकार्‍यांपासून लोककलावंत, जनसामान्यपर्यंत अनेकांशी नाते जोडले.सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित केले. माहिती विभाच्या क्षेत्रात सर्वसामान्यांचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेले व तळागाळातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडणारे आदरणीय कर्त्तव्यनिष्ठ निलेश तायडे हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून आज नावलौकीक मिळविला आहे.त्यांच्या या सेवेत त्यांनी अनेक जनतेच्या भावना व आवश्यकता समजून घेऊन शासनाची अनेक माहिती तत्परतेने जनतेपर्यंत पोहचविला.त्यामुळेच लोकांना त्यांचा मोठा आधार वाटू लागला . आतापर्यंतच्या कारकिर्दीत आलेली कोराना संकटामध्ये त्यांनी शांत व उत्कृष्ट नियोजनाने, त्यांना संकटे न म्हणता आव्हाने आहेत असे म्हणत संकटांचा सामना करीत परिस्थिती हाताळून त्यातून मार्ग काढला . सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना महामारीमध्ये आपल्या कार्यकुशलतेने यशस्वी सामना करत आपली जबाबदारी पार पाडली आहे.या युद्धात स्वतःची व आपल्या परिवाराची पर्वा न करता त्याच्यासह संपूर्ण परिवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यातून बरे होऊन खरे कोरोना योद्धा म्हणून कोरोनाशी युद्ध लढतत्यांच्या अत्यंत मृदू, संयमी,मनमिळाऊ,कार्यकुशलतेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळवून दिल्यामुळे ते यशस्वी झाले.प्रशासनाने जनतेच्या सेवेत तयार केलेले अनेक उपक्रम, योजना, अभियान व विविध आरोग्य शिबीरे या कामांनी त्यांनी प्रशासकीय माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहचवली आहे.

लोकहितार्थ दृष्टीने प्रशासन  शासनाची प्रत्येक योजना जनसामान्यापर्यंत कशी पोहचेल यासाठी सतत प्रयत्न करीत असतात.हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यांत किंवा कार्यालयांत सार्वजनिक अधिकार्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात. ते नागरीकांना त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार माहिती देण्याचे काम करतात. लोकांनी माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंत्या हाताळणे आणि जी व्यक्ती विनंती लिखित स्वरूपात देऊ शकत नसेल अशा व्यक्तीस ती विनंती लिखित स्वरूपात लिहिण्यास मदत करणे.जर मागविण्यात आलेली माहिती दुसर्या सरकारी अधिकार्याच्या अखत्यारीत येत असेल तर ती विनंती संबंधित अधिकार्याकडे पाठवणे आणि तसे अर्जदाराला ताबडतोब कळविणे.जनमाहिती अधिकारी त्याचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत माहिती देत असतात.कर्तुत्वान प्रशासकीय अधिकारी निलेश तायडे साहेब विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून संदेश देतात की, 

आपले ध्येय ठरवा
यश मिळविण्यासाठी आपले ध्येय काय आहे ते आपल्याला माहीत पाहीजे, जर तुम्ही तुमचे ध्येय ठरवले नसेल तर अगोदर आपले ध्येय निश्चित करा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची,माहिती गोळा करा, त्यासंबंधीत जी माहिती मिळेल ती एकत्रित करा व त्याबद्दल वाचन करा. आपल्या ध्येयासंबंधित जे काही उपयोगी पुस्तक ,लेख,इंटरनेटवर नविन माहिती याचा संग्रह करा. मिळालेल्या माहितीचा सविस्तर खोलवर अभ्यास करा व आपल्या भाषेमध्ये आपल्याला उपयोगी असणाऱ्या व आपल्या विचार पेपरवर लिहित चला. सर्व बाबींवर अत्यंत बारकाईने लक्ष देऊन काम करा.

स्व:तावर  आत्मविश्वास ठेवा
आपण एखाद्या ध्येयाची पुर्तता करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो, पण या मार्गावर चालत असताना अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. या समस्या कुठल्याही प्रकारच्या असु शकतात, जरूरी नाही कि सर्व समस्या आपल्या ध्येयासंबंधितच असतील,पण त्यावर मात करित आपल्याला पूढे जायचे आहे हे आपल्या लक्षात असले पाहीजे. 
त्यासाठी स्वतावर आत्मविश्वास असला पाहिजे.आपण हाती घेतलेले कार्य आपण करू शकतो, होय मला हे नक्कीच जमेल, मी हे करू शकतो असा  सकारात्मक विचार तुमच्यात असलाच पाहिजे तरच आपल्या ध्येयाची पुर्तता आपण करू शकतो असा मला विश्वास आहे.

अपयश मिळाल्यास खचून न जाऊ नका!
बरेच लोक आपल्या ध्येयाची पुर्तता करत असताना त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो,त्यामुळे ते दुखी होतात,हताश होतात आणि आपले काम मध्येच सोडून देतात. आपल्या मनाशी ठरवून घेतात की हे काम आपण करू शकत नाही. त्यांचा स्वतावर असलेला विश्वास कमी कमी होत जातो व आपण हाती घेतलेले काम मध्येच सोडून देतो. पण आपण कुठे चुकलो असेल?, कुठल्या गोष्टीची कमतरता राहून गेली असेल?, आपण कुठे कमी पडलो?,यासर्व बाबींवर विचार करण्याचा विचारच त्यांच्या मनामध्ये येत नाही.अगदी मोजकेच व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहचलेली आहे, त्यांनी कधी अपयशाचा सामना केला नसेल असही नाही याउलट म्हणजेच ह्या सर्व व्यक्तींनी भरपूर वेळेस अपयश पचवले आहे,असंही म्हणायला हरकत नाही कि या व्यक्तींनी अपयशाच्या भरपूर पायऱ्या चढलेल्या असतात तरीही आपल्या ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने पून्हा भरारी घेऊन अपयशाचे जिने चढून यशाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेतला आहे.अशा प्रशासकीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवणारा आश्वासक चेहरा म्हणून सहायक माहिती अधिकारी निलेश तायडे साहेबांकडे पाहिले जाते यांच्या कार्यकर्तुत्व वाखड्याजोगे असल्याने यांच्या कार्याला त्रिवार सलाम....!


Post a Comment

0 Comments