Ticker

6/recent/ticker-posts

भूविकास बँक कर्मचाऱ्यांनाही मिळणार थकबाकी

 अमरावतीत ट्रामा केअर युनिट मंजूर , अमरावती विमानतळावर नवे टर्मिनल उघडणार



मुंबई ११ मार्च : राज्य विधिमंडळींच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ११ मार्च रोजीच्या कामकाज दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांनी वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला . आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात त्यांनी अनेक विकासात्मक बाबींची घोषणा केली असून दरवर्षी प्रमाणे अमरावतीला भरभरून काही देण्यात आले आहे. अमरावती मध्ये आपत्कालीन आरोग्यस्थितीच्या दृष्टीने ट्रामा केअर युनिट मंजूर करण्यात आले असून अमरावती -बेलोरा विमानतळावर नवे टर्मिनल्स उभारणार असल्याची घोषणा बजेट मध्ये करण्यात आली आहे.  मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे बांधकामासाठी निधी , अमरावती मध्ये बियाणी चौक ते तपोवन पर्यतच्या काँक्रीट रस्ता चौपदरीकरण , तसेच  भूविकास बँक कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याची  घोषणा  बजेटमध्ये करण्यात आली आहे. याबद्दल आ. सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती शहरी भागासह ग्रामीण क्षेत्र व मेळघाट -धारणी सारख्या दुर्गम भागातील आपत्कालीन रुग्णांना अतिदक्षतेच्या आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेला नवी संजीवनी देऊन आपत्कालीन रुग्णांना तात्काळ हायटेक सुविधा उपलब्ध व्हावी , या अनुषंगाने अमरावती मध्ये ट्रामा केअर युनिटची घोषणा  नामदार अजितदादांनी  बजेट मध्ये केली .  अमरावती- बेलोरा विमानतळाच्या  विस्तारित धावपट्टीचा  विकास करण्यासह  प्रशासकीय इमारतीमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ पेसेंजर टर्मिनल बिल्डिंग , एटीसी टॉवर , इलेक्ट्रिक सब स्टेशन संबंधित कामे , तसेच रात्रीच्या लँडिंग साठीची व्यवस्था आदी कामांसंदर्भात सुद्धा आमदार सौ .सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांना अधिवेशनाच्या अनुषंगाने झालेल्या भेटी दरम्यान  अवगत केले होते . यासाठी आता अमरावती - बेलोरा विमानतळावर नवे टर्मिनल्स  उभारणार  असल्याची  घोषणा नामदार अजितदादांनी  विधानसभेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली .  
 त्याचबरोबर अमरावतीमध्ये  २५० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाला मान्यता मिळाली आहे. मात्र गेल्या सहा-सात  वर्षांपासून  निधी अभावी नवीन इमारत अजूनही उपलब्ध न झाल्याने सदर वसतिगृह हे  भाड्याच्या  इमारतीत सुरु आहे. यासाठी सुद्धा  बजेट मध्ये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. सुलभाताई खोडके  यांनी  मंत्रीमहोदयांकडे  पत्राद्वारे केली होती . 

या संदर्भातील पुरवणी मागणी सुद्धा अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर  अमरावती ते मार्डी -कुऱ्हा मार्गावरील बियाणी चौक ते तपोवन पर्यंतचा मार्ग हा अमरावती विधानसभा मतदार संघात मोडत असून निवासी क्षेत्र , विद्यापीठ , नामांकित शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल आहेत.  वाढत्या रहदारी मुळे हा रस्ता सुरक्षित अवागमनासाठी अपुरा वाटत  असल्याने  रस्त्याचे काँक्रिटयुक्त चौपदरीकरण होणे गरजेचे आहे.  त्यादृष्टीने आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी  २०  कोटींच्या निधीची मागणी केली . ही मागणी देखील  नामदार अजितदादा पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात मंजूर केली आहे. राज्यातील सर्वसमावेशक जनतेला केंद्रबिंदू मानून बहुजन हिताय बहुजन सुखाय असा अर्थसंकल्प मांडत असतांना  राज्यातील भूविकास बँकेच्या जवळपास २,५०० कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन , ग्रॅज्युडी  तसेच इतर आर्थिक लाभांच्या थकबाकी मिळण्यासंदर्भात यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.  

अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी नियोजित कामांचा प्रस्तावच वित्तमंत्री महोदयांकडे सादर केला असता , अमरावतीच्या वाट्याला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पात भरभरून काही देण्यात आल्याने आ. सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments