Ticker

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा घोटला गळा

 


चारीत्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला मारहाण करत हाताने गळा आवळून खून केल्याची घटना पुणे येथील लोणकर शाळेच्या मागे वडगावशेरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसानी आरोपी पती किशन उर्फ कृष्णाप्पा तुळप्पा चव्हाण (वय. ४२) याला अटक केली आहे. 

तर सिताम्मा किशन उर्फ कृष्णप्पा चव्हाण (वय. ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जगन्नाथ होनबा राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशन चव्हाण याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन चव्हाण हा पत्नी सिताम्मा हिच्यासोबत वडागावशेरी लोणकर शाळेच्या मागे बसथांब्याजवळील बाळासाहेब चांदेरे यांच्या मोकळ्या जागेतील प्लॉटमध्ये राहत होता. दोघेही मुळचे कर्नाटक येथील असून बिगारी काम करतात. किशन पत्नी सिताम्मा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांत वाद होते होते. बुधवारी रात्री दोघांत वाद झाले होते. त्यावेळी किशन याने सिताम्मा हिला मारहाण करून हाताने गळा आवळला.

वादाच्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तत्काळ अटक केली. सिताम्माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments