Ticker

6/recent/ticker-posts

ठाकरे सरकार बेवड्यांना व दाऊदला समर्पीत सरकार

Devendra Fadanvis Vidarbhadoot Mumbai


मुंबई-उद्यापासून अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. विविध महत्त्वाच्या मुद्यांवर, धोरणांवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होणार आहे.ठाकरे सरकार अधिवेशनासाठी परिपूर्ण तयारी करीत असून याच अनुशंगाने भाजप पक्षाच्या राज्यातील नेत्यांची आज बैठक झाली आहे. अधिवेशनात विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या भाजपने विरोधाची तयारी सुरुवातीपासूनच करण्यास सुरुवात केली आहे. हे आजच्या पत्रकार परिषदेवरुन दिसून येत आहे.


नवाब मलीक यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक चर्चांना उत आला आहे. विरोधी पक्षाने मोठी टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पाश्र्वभूमिवर विराधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी हे सरकार गुंड लोक, आणि दाऊद सारखी मंडळी अशा लोकांसाठी काम करीत असल्याचे म्हटले आहे. दाऊद गॅगला समर्पित असेलेले हे ठाकरे सरकार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.


यासोबतच राज्य सरकार गावागावांमध्ये दारु ची दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरुन एकच दिसून येते, की हे सरकार म्हणजे, बेवड्यांना समर्पीत असलेले सरकार आहे. असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा या सरकारच्या काळात झाला असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments