Ticker

6/recent/ticker-posts

युवाकवी संदीप देशमुख राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित

 


अकोला प्रतिनिधी-तरूणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केंद्रीय सदस्य संदीप देशमुख यांना नुकताच दि.१३ फेबुवारी २०२२ कान्होबा चौक पातुर येथे साने गुरूजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु. मंडळ पातूर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण पातुर  यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा पुरस्कार जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव तसेच जिल्हा युवा संमेलनात  मान्यवराच्या हस्ते देण्यात आला दरवर्षी स्व‌.विनायक राखोंडे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा मानाचा  राज्यस्तरीय युवा पुरस्कार अखंडपणे विविध सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबविणाऱ्या युवाना दिला जातो पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व नामगौरव वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नाट्य कलावंत गजानन पोपळघट व शाहिर कविश्वर अवचार राज्य युवा पुरस्कार प्राप्त विशाल राखोंडे संस्थेचे अध्यक्ष सागर राखोंडे व आदींची प्रमुख उपस्थितीत देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ चे संस्थापक विशाल राखोंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सागर राखोंडे यांनी  करुन आभार पल्लवी मांडवगने यांनी केले यावेळी गेला १५ वर्षा पासून युवासाठी कार्य करणारे  संदीप देशमुख हे तरूणाई फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात हे विशेष म्हणजे कि नवतरुन साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिली आहे व अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्यांनी ९ वेळा सहभाग घेऊन कविता कट्टा मध्ये आपल्या कविता सादर केल्या व त्यांचा विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Post a Comment

0 Comments