Ticker

6/recent/ticker-posts

युवक-युवतींना कृषी-आधारित उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

  


 विस्तार शिक्षण संचालनालय,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे वतीने जिल्हा नियोजन व विकास समितीचे सहयोगातून अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून 2700 युवक-युवतींना कृषी आधारित रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत कृषी-आधारित उद्योजकता संदर्भात दोनदिवसीय कृतीयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचे मालिकेत सोमवार मंगळवार दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी दरम्यान फक्त युवकांसाठी "दुग्ध पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान" या विषयावरील 75 युवकांची एक बॅच आणि "व्यावसायिक भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान" विषयावरील 75 युवकांची एक बॅच साठी नोंदणी सुरु आहें. कृपया गरजवंत युवकांनी श्री निखील धाबेकर  (मोबाईल क्रमांक 9405471844)यांचे कडे नावे नोंदवावीत. यासह संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातील प्रशिक्षणाचे नियोजन सोबत दिले आहे त्यानुसार पूर्वनोंदणी करून या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments