Ticker

6/recent/ticker-posts

येथे आहे घाणच घाण...

खडकी मधील न्यू महसूल कॉलनी येथे घाणीचे साम्राज्य


घरासमोर साचली संडासच्या पाण्याचे गटारे,


साथीच्या रोगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Vidarbhadoot akolaअकोला  - खडकी विभाग हद्दवाढीतील  प्रभाग क्र. २० मध्ये येत असलेल्या न्यू महसूल कॉलनी, साईनाथ कॉलनी, शिक्षक कॉलनी, संत नगर, गजानन नगरी मध्ये मध्ये आतापर्यंत निवडूण आलेल्या नगरसेवकांनी पूर्णपणे वार्‍यावर सोडले आहे. या विभागात ग्रा.पं.ने बांधलेल्या नाल्या व्यतिरीक्त या नगर सेवकाचे माध्यमातून महानगर पालिकेने आतापर्यंत नालीचे बांधकाम सुद्धा केले नाही व कॉलनीतील संडासचे पाणी लोकांच्या घरासमोर साचून गंधगीचे गटारे साचले आहे. या साचलेल्या घाण पाण्यामुळे मच्छराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे व यापासून साथीच्या रोगाला जणू आमंत्रण दिल्या जात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हद्दवाढीतील हा विभाग रोडपासून, नाल्यापासून, लाईट पासून वंचित आहे. येथे रात्रीला मोठमोठे विषारी साप निघतात परंतू लाईटची व्यवस्था करण्याचे सांगून सुद्धा अंधारात जीवन कंठावे लागत आहे. फक्त हद्दवाढीतील नागरिकांना टॅक्स भरण्यासाठीच महानगर पालिकेत समाविष्ठ केले की काय अशी शंका नागरिकांमध्ये आहे. आता पुढच्या वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत व विद्यमान नगरसेवकांबद्दल लोकांच्या मनांत कमालीची चिड निर्माण झाली आहे. आयुक्त मॅडम यांना नागरिकांची विनंती आहे की, आम्हाला या संडासच्या पाण्याच्या साचलेल्या गटारापासून आमची मुक्तता करा, नाली सफाईचे कामे करा, किमान नाल्याचे बांधकाम करा, संडासच्या  पाण्याची  व्यवस्था मार्गी लावा अशी मागणी नागरिकांंकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments