Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक कडधान्य दिवस



कडधान्य विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यावतीने दिनांक १० फेब्रुवारी रोजी तिवसा ता. बर्शिटाकली जि. अकोला येथे साजरा करण्यात आला. कडधान्याचे मानवी आहारातील महत्व ओळखून २०१९ सालापासून संयुक्त राष्ट्र संघाने १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून जाहीर केला असून तो जगभर साजरा केला जातो. दिनांक १० फेब्रुवारी रोजी कडधान्य संशोधन विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी जागतिक कडधान्य दिवसांचे आयोजन तिवसा तालुका बर्शिताकली जिल्हा अकोला येथे डॉ. इ.आर. वैद्य, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शनात केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. टी. देशमुख, सहयोगी संचालक (संशोधन), डॉ. नितीन पत्के, उप संचालक (बियाणे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, श्री. गजानन लुले, सरपंच, तिवसा, सौ. इंगोले, उप सरपंच, तिवसा हे लाभले. कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी श्री. प्रदीप देशमुख, मु. पो. रिधोरा व श्री. विनोद देशमुख मू.पो. सवडद जिल्हा बुलढाणा हे देखील उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. डॉ. किशोर बिडवे यांनी व डॉ. इ.आर. वैद्य यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रगतशील शेतकरी श्री. प्रदीप देशमुख व विनोद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारे निर्मित हरभरा वान पिदिकेव्ही कांचन व कनक या वाणाचे फायदे सांगितले. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक विस्तार शिक्षण यांनी आपल्या मार्गदर्शनात कडधान्य पिकाचे शेतकऱ्यासाठी असणारे महत्व व तसेच या पिकाचे आहारातील महत्व सांगितले व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. सर्व उपस्थितांसाठी मास्क व सानितायझरची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. प्रज्ञा कदम यांनी आभाप्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. इ.आर. वैद्य यांचे मार्गदर्शनात डॉ. अर्चना थोरात, सहयोगी प्राध्यापक, डॉ. सुहास लांडे, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. प्रज्ञा कदम, गीतांजली कांबळे, निखिल बोकडे यांनी अथक प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments