Ticker

6/recent/ticker-posts

सहाव्या वर्गातील ज्ञानेश्वरीचे मुख्यमंत्र्यांना पत्र



अकोट- तालुक्यातील वरुर जऊळका या गावातील अकोट मध्ये सेंड फाँल स्कूलमध्ये सहाव्या वर्गा मधे शिक्षण घेत असणाऱ्या ज्ञानेश्वरी गणेश शेटे या अकरा वर्षाच्या मुलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना एक विनंती पर पत्र पाठवलेले आहे आणि पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे आहे. मुख्यमंत्री साहेब गेल्या दोन वर्षात कोरोना कालखंडामध्ये सर्व शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. एखाद्या व्यापाऱ्यांचे, व्यवसायिकाचे नुकसान झाले तर ते भरून निघेल पण विद्यार्थ्यांचे नुकसान कधीही भरून निघणार नाही.



    जेमतेम आता शाळा चालू झाल्या होत्या पण पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली हे पाहून आपण आमच्या लहान मुलांच्या जीवाची काळजी करून पुन्हा शाळा ऑफलाइन बंद केल्या व ऑनलाईन चालू केल्या आहेत.

   पण ऑनलाइन शिक्षणामध्ये भरपूर अडचणी येत आहेत. आमच्या गावातील गेल्या दोन दिवसापासून लाईन बंद होती. त्यामुळे टावर बंद पडले ,मोबाईल बंद पडले आम्ही अभ्यास करायचा तरी कसा ?

     आणि म्हणून आपण जर  हॉटेल ,मॉल 50%चालू ठेवत आहात तर आमच्या शाळेमध्ये माझ्या वर्गात जर 50 विद्यार्थी शिकत असतील तर त्यामधील 25 विद्यार्थी आज व 25 विद्यार्थी उद्या शाळेमध्ये बोलण्याची परवानगी द्या.

    पण ऑफलाईन शाळा चालू करु द्या जेणे करुन आमच्या शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होईल. आम्ही शाळेमध्ये कोरोणा चे सर्व नियम पाळून शालेय शिक्षण घेऊ आपण आमच्या लहान मुलांची खूप काळजी घेत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार पण आमच्या या विनंती बद्दल गांभीर्याने विचार करावा हे आपणास नम्र विनंती करते साहेब मी बाल कीर्तनकार आहे कीर्तन करून परमार्थ ही करते आणि शालेय शिक्षण सुद्धा सांभाळते. आज तुमच्या सोबत पत्राद्वारे बोलताना लहान तोंडी मोठा घास घेतला आहे पण असं म्हणतात मुले ही देवाघरची फुले म्हणून आमच्या विनंतीस मान द्यावा आपली ज्ञानेश्वरी गणेश शेटे. अशा आशयाचे पत्र मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव राज ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments