Ticker

6/recent/ticker-posts

दहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणाचा दोन मुलांची आई असलेल्या विवाहीत महिलेवर अत्याचार, विवाहिता झाली प्रेग्रेंट!वर्धा / विशेष प्रतिनिधी- वासनेच्या आहारी जाऊन कोण काय पाऊल उचलेल याचे आजच्या काळात सांगता येत नाही. अशीच धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली आहे. दोन मुलांची आई असलेल्या एका विवाहीत महिलेला गोड-गोड बोलून एका तरुणाने त्याच्यापेक्षा दहा वर्षानी मोठ्या असलेल्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले व  त्यानंतर त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ वर्षीय हरीश किंधरले, रा. दाऊतनगर, आर्वी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी हरीश याने एकाच ठिाकणी कामाला असतांना सदर महिलेशी जवळीक वाढविली. गोड-गोड बोलून सदर महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पुलगांव येथील एका लॉजवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला.

 त्यानंतर तुझी बदनामी करेल, असे सांगत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापित केले. तेथून पुढेही तो थांबला नाही. आर्वी येथील एका मंदीराजवळ असलेल्या एकांतातील जागेवर नेऊन ब:याच वेळा अत्याचार केला आहे. त्यामुळे पीडित महिला आता आठ महिन्यांची गर्भवती झाली आहे. त्यामुळे आता महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments