Ticker

6/recent/ticker-posts

आमदार साहेब माझ्याकडून मुलगी पटविल्या जात नाही, मदत करा; तरुणाने लिहले आमदारांना पत्रचंद्रपूर- विशेष प्रतिनिधी- आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्वां'याच हक्काचे स्थान म्हणजे आप-आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे असतात. मतदार संघातील नागरिकही मोठ्या आशेने आमदार-खासदार यांना विनंतीची निवेदन देत असतात. अनेक समस्या सुटतात, तरी काही समस्या तशाच राहतात. हे अनेक उदाहरणांवरुन दिसून येते. पण आता लोकप्रतिनिधींकडे मागण्या कोण कशा प्रकारे करेल याचा काहीही भरवसा नाही. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बाजूरा विधानसभा मतदार संघातील आमदार सुभाष धोटे यां'याकडे आली आहे. विशेष म्हणजे तरुणाने आमदार महोदयांना पत्र लिहेले परंतु, ते देण्याचे धाडस झाले नाही, मग तेच पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहे. या पत्राने मात्र जिल्हाभरात आणि विदर्भात एकाच चर्चाना उत आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, भूषण जा. राठोड हा तरुण आमदार धोटे यां'या मतदार संघातील एका खेडेगावातीला रहिवाशी आहे. नेमका कोणत्या गावाचा आहे, याबाबत मात्र अजून काहीच पत्ता लागलेला नाही. त्याचा शोध घेणे सुरु आहे.  त्याने पत्रात याचना केली आहे, की आपल्या मतदार संघात अनेक मुली आहेत, पण मला एकही गर्लफे्रंड नाही. कोणतीही मुलगी मला भाव देत नाही. पोरी दारु विकणारे, मोकाट फिरणारे यांना भाव देतात. अशा मुलांकडून मुलीही पटतात. पण एवढा सभ्य मुलगा असूनही एकही मुलगी माझ्याकडून पटत नाही. तरी आमदार साहेब, आपण कीहीतरी मदत करावी. जेणेकरुन माझ्याकडून मुलगी पटविल्या जाईल. अशा आशयाची याचना या तरुणाने पत्रात केलेली आहे. आमदार साहेब माझ्यासारख्या मुलांनाही मुली भाव देतील यासाठी आपण मुलींना प्रोत्साहीत करावे, असेही त्या तरुणाने पत्रात म्हटले आहे.

याबाबत आमदार धोटे यां'याशी संपर्क केला असता, त्या तरुणाचा शोध कार्यकर्ते घेत आहेत, तो सापडल्यावर त्याची नेमकी समस्या काय आहे, हे जाणून घेतल्यावर त्याचे निराकारण केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सदर पत्र आपल्याला डायरेक्ट दिले नसून सोशल मीडिया'या माध्यमातून माझ्यापर्यंत आले आहे, असेही आमदार धोटे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments