Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कंचनपूर येथे कोविडचे लसीकरण



AKOLA- अकोल्यातील कंचनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त स्थानिक नागरिकांनी कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरणाची मोहीम राबविली. कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ वा वाढदिवसानिमित्त कंचनपूर येथील उपसरपंच शिवशंकर पाटील डिक्कर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून उपस्थित नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले असून डॉक्टर याच्या मार्गदर्शनात गावातील नागरिकांनी पहिला डोस घेतलेल्या महिला व पुरुषांना दुसरा  डोस म्हणून कोविड लसीचे इंजेक्शन देन्याय आले.

 तसेच पहिला डोस घेणाऱ्याची ही लक्षणीय उपस्थिती होती. दरम्यान लस घेणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करून घेण्यात आली या वेळी १३९ जणांचे लसीकरण झाले असून १०९ जणांना प्रमाण पत्राचे वाटप देवखील करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील चोरे भाजपा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा भाऊ मोरखडे गणेश तायडे किशोर कुचके गजानन चोरे एकनाथ पाटील राजू चोरे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ठाकरे सर शेगोकार सर प्रल्हाद भाऊ चोरे पंजाबराव पाटील शेळके विष्णू पाटील चोरे,दिनेश चोरे, प्रदीप चोरे, राम चौरे, पंकज शेळके, संदीप श्यामभाऊ झोरे, शिवा पारस्कर, अनंत शेळके ऋषभ चौरे शैलेश शेळके तसेच अमित भाऊ देवर, भाजप युवा सोशल मीडिया प्रमुख अभिलाष मोरे बूथ प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे अंगणवाडी सेविका ज्योती चोरे गावातील पोलीस पाटील विठ्ठल पाटील शेळके ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्य गण बचत गटाच्या सीआरपी ज्योतीताई डिक्कर यांची उपस्थिती होती. 

 या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन गावचे उपसरपंच,भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला जिल्हा ग्रामीण तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवशंकर पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments