Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धी डिडोळकर प्रथम

पाडळी मॅरेथॉन मध्ये पुरूषात शुभम राठोड तर महिला गटात सिद्धी डिडोळकर प्रथम




बुलडाणा- तालुक्यातील पाडळी येथील पुरूष व महिला खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात राठोड तर महिला गटात सिद्धी डिडोळकर प्रथम आली आहे. यंदा प्रथमच बुलडाणा तालुक्यातील पाडळी येथील युवकांनी पुरूष व महिला खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 4 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

पुरूष गटासाठी आठ किलोमीटर तर महिला गटासाठी तिन किलो मीटरची ही स्पर्धा होती. पुरूष गटात शुभम राठोड हा प्रथम आला तर अर्जून साळवे, किशोर हिवाळे हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहे. या तिनही विजयी स्पर्धकांना चंद्रकांत डुकरे, गणेश जाधव व डॉ. गावंडे यांचे हस्ते रोख रक्कम व पदक देण्यात आले आहेत.
तसेच महिलांच्या खुल्या गटात बुलडाणा येथील सिद्धी राजेश डिडोळकर प्रथम आली तर गौरी राठोड व उत्क्रांती हिंगे या अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या आहेत. 

महिलांच्या गटात समाधान टेकाडे, नागेश्वर पवार व अमोल नरोटे यांचे हस्ते रोख रक्कम व पदक देऊन गौरविण्यात आले. पाडळी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी दोन्ही गट मिळून सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनोद चव्हाण, नागेश पवार, आकाश जाधव, प्रसाद जाधव, निलेश पवार, चंद्रकांत डुकरे, अमोल नरोटे, किशोर माळोदे, उल्हास पवार, सागर काळे यांनी परिश्रम घेतले.

तेजस्वी स्पोर्टसचे घवघवीत यश
पाडळी येथे झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत महिलांच्या गटात तेजस्वी स्पोर्टस क्लबच्या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन केले असून प्रथम, द्वितीय  आणि तृतीय तिन्ही बक्षीस तेजस्वी स्पोर्टसने पटकाविले आहे. या स्पोर्टसचे क्रीडा मार्गदर्शक  विजय वानखेडे व राजेश डिडोळकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी सराव करतात.

Post a Comment

0 Comments