Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमात अडचण ठरत असलेल्या ६ वर्षी पोटच्या मुलाची आईनेच केली हत्या, प्रियकरासह आईला अटकजालना-विशेष प्रतिनिधी-  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडसर ठरत असलेल्या ६ वर्षीय पोटच्या मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. आई आणि प्रियकराने खून करुन, आपल्या मुलाचे अपहरण झाले आहे, असा बनाव करीत होते. या घटनेने समाज मनात हळहळ व्यक्त होत आहे. तर त्या आई व प्रियकराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

डावरगाव हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गाव आहे. याच गावात शितल उघडे ही महीला राहते. शितल आपल्या भावाला दवाखाण्यात घेऊन आली होती. तेथे आली असता तिच्यासोबत तिचा सहा वर्षीय मुलगा होता. नंतर दखाण्यात भावाचे उपचार झाल्यावर ती औषधी आणण्यासाठी बाहेर आली. त्यावेळी तिने जवळच उभ्या असलेल्या एका इसमाकडे काही वेळ आपला मुलगा दिला. नंतर ती औषधी घेऊन आल्यावर तेथे मुलगा नव्हता. तिच्या भावाने व तिने बरीच शोधाशोध केली, परंतु मुलगा सापडला नाही. नंतर तिने पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलाचे अपहरण झाले असल्याची तक्रार केली. परंतु हे सर्व भाऊ व सर्वांनाच वाटले पाहीजे, की तिच्या मुलाचे अपहरण झाले आहे, याचसाठी तिने केले. खरे तर तिने तिच्या मुलाला प्रियकराच्या हवाली केले होते. 

 दरम्यान शोधाशोधीचे नाटक करीत तिने अंबड पोलीस ठाण्यात  मुलाचे कुणीतरी अपहरण केले आहे, अशी तक्रार केली. परंतु तिच्या बोलण्यावरुन, पोलिसांना थोडा संशय आला. अनोळखी असल्याचे सर्वांना सांगत असलेल्या प्रियकराचा मोबाईल क्रमांकही तिने पोलिसांना दिला. आणी त्यातूनच समोर पोलीसांना तपासाची योग्य दिशा मिळाली.

 दिवसा ढवळ्या घडलेल्या अपहरण प्रकरणाने पोलीस देखील चक्रावले. नंतर उशिरा  रात्री अंबड शहरापासून सहा किलोमिटर  घनसावंगी रस्तावर लहान मुलाचा एका शेतात मृतदेह आढळुन आला. त्या मुलाच्या तोंडात कपड्याचा बोळा घातलेला होता. त्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. आणि तो मयत मुलगा आदीत्य म्हणजेच अपहरण झालेल्या महिलेचाच असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

हत्येचा उलगडा असा झाला
कथीत अपहरण झालेल्या मुलाची कुणीतरी हत्या केली हे स्पष्ट झाल्यावर पोलीसांनी आपल्या तपासाला गती देत, त्या मुलाच्या आईने दिलेल्या मोबाईल नंबरवरुन नवनाथ जगधने नामक तिच्या प्रियकराला रात्रीच ताब्यात घेतले. परंतु नवनाथ जगधने सुरुवातीला आपण त्यातील नसल्याचे पोलीसांना भासवत होता. नंतर पोलीसांनी आपल्या दणका दाखविल्यावर मात्र तो पोपटासारखा बोलायला लागला. आरोपीने अपहरण झाल्याची तक्रार करणा-या मुलाच्या आईसोबतच आपले प्रेमसबंध असल्याने सांगितले. त्या महिलेचा सहा वर्षी मुलगा त्यांच्या प्रेमात अडचन ठरत होता. त्यामुळेच आम्ही दोघांनी म्हणजेच आई आणि प्रियकरणे त्या मुलाचा काटा काढण्याचे ठरविले. आणि त्यातूनच मुलाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी मृत आदित्यची आई असलेल्या शीतल उघडे हिला अटक केली. या  दोघांना साथ देणारा सह आरोपी गणेश रोकडे यालाही अटक केली.  आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिल्याने या प्रकरणी अंबड पोलिसांनी या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सुग्रीव चाटे, पोलीस उपनिरीक्षक अंबड यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी नवनाथ जगधने आणि गणेश रोकडे यांनी आदित्यची हत्या करून त्याचा मृतदेह घनसावंगी रोडवरील नाल्याजवळ फेकल्याची रात्री कबुली दिली. एकीकडे या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना लवकर यश आले असले तरी अपहरणाचा बनाव करून हत्या झालेल्या मुलाचा जीव वाचवण्यात पोलिसांना मात्र अपयश आले. या घटनेची माहिती गावात आणि तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे व संतापाची लाटही उसळली आहे.

Post a Comment

0 Comments