Ticker

6/recent/ticker-posts

AKOLA पाच लाख चाेरट्यांनी ऑनलाइन पळविल्याचा धक्कादायक प्रकार



AKOLA-जास्त पैशांचा हव्यास हा नेहमीच अंगलट येतो हे वेळोवेळी घडणाऱ्या अनेक घटनांवरून दिसून येते. तरीही लोकांमध्ये जास्त पैसा कमविण्याची हाव काही कमी होत नाही,असेच दिसून येते. आपल्यातही धक्कादायक अशी घटना घडली आहे. ज्यामध्ये जास्त पैशाची हाव देऊन जवळपास पाच लाख रुपयांनी एका उच्चशिक्षित व्यक्तीला लूटले असल्याची घटना झाली आहे.

 ऑनलाइन चोरट्यांनी एका व्यक्तीला पाच लाख रुपये गुंतवून त्यावर भरमसाठ व्याज मिळणार असल्याचे एका ॲप द्वारे कळविले आणि 30 ऑगस्ट रोजी जवळपास पाच लाख रुपयांनी लुटले.

 याप्रकरणी सदर उच्चशिक्षित व्यक्तीने अकोला सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अकोला सायबर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून, या ॲप द्वारे ऑनलाईन पैसे चोरणारांचा छडा लावून संबंधित व्यक्तीला त्याचे पैसे मिळवून दिले.

 या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की अकोल्यामधील एका उच्च शिक्षित व्यक्ती ने पैसे गुंतविण्यासाठी ऑनलाइन ॲप द्वारे सर्च केले.  त्यावेळी त्याला अनेक ठिकाणी ऑनलाइन पैसे गुंतवून जास्त व्याज मिळणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर ॲप द्वारे पाच लाख रुपये डिपॉझिट केले परंतु त्यानंतरही संबंधित ॲपच्या अपडेट्सच्या नावाखाली त्याला वारंवार पैशाची मागणी व्हायला लागली. त्यामुळे त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने नेशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली. 

 त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक उज्वला देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे ओमप्रकाश देशमुख यांनी तपास केला. व संबंधित व्यक्तीला त्याचे पळविलेले पाच लाख रुपये परत मिळवून दिले.

Post a Comment

0 Comments