Ticker

6/recent/ticker-posts

अवघ्या 325 रुपयांत घरबसल्या करता येईल कोरोना चाचणी

From Pixabay


नवी दिल्ली | कोरोना चाचणी करण्यासाठी दरवेळी घराबाहेर पडणे अनेकांना शक्य होत नाही. परंतू प्रश्न आरोग्याचा असल्याने केंद्रावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय देखील उपलब्ध नव्हता.


अशातच आता एक दिलासादायक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. हेल्थ केअर या कंपनीचे प्रमुख अबॉट यांनी, आता घरबसल्या कोरोना चाचणी करता येईल, असं किट बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.


देशातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या कोरोना चाचणी केल्यामुळे योग्य वेळेत उपचार सुरू करणे आणि विलागिकरणात राहणे सोपे होईल. तसेच यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासही मदत होईल. सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभुमीवर कंपनीने रॅपिड अँटीजन चाचणी किट विकसित केले आहे, अशी माहिती अबॉट यांनी दिली आहे. 


Abott Panbio Covid-19 असे या किटचे नाव असून, ते नागरिकांना लवकरच बाजारात उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 


तसेच जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 70 लाख किट उपलब्ध करून दिले जातील, असंही या कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


घरबसल्या करण्यात येणाऱ्या या कोरोना चाचणी किटची किंमत 325 रुपये एवढी ठरविण्यात आली आहे. तसेच यामध्ये प्रामुख्याने 1 किट, 4 किट, 10 किट आणि 20 किट अशी पॅकिंग असणार आहे. त्यापैकी एका किटसाठी 325 रुपये, 4 किटसाठी 1250 रुपये, 10 किटसाठी 2800 रुपये तर 20 किटसाठी 5400 रुपये मोजावे लागणार आहेत.

Post a Comment

0 Comments