Ticker

6/recent/ticker-posts

मराठमोळी सई आता दिसणार, या नव्या हिंदी चित्रपटात



मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर सर्वांना परिचित आहे. तिचा अभिनय देखील हा तिच्याप्रमाणे तितकाच दमदार असतो. आपल्या अभिनयाने तीने प्रेक्षकांच्या मनावर तीने वेगळीच छाप उमटवली आहे. 


मराठी आणि हिंदी अशा अनेक चित्रपटांमध्ये सईने दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अशातच सईने तिच्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या चित्रपटाची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे.


आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सईने एक पोस्ट शेअर करत ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच सईने पोस्ट शेअर करत म्हटले की, या जुलैमध्ये, सामान्य पासून विलक्षण अपेक्षा! संपर्कात रहा. मिमी.


मिमी या चित्रपटात मुख्य भूमिकेत क्रिती सेनन दिसणार आहे. चित्रटाचा विषय सरोगसी असा आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. 


त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताथना दिसत आहे. हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक 'मीमी' असणार आहे. यात सई ताम्हणकरसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.


https://www.instagram.com/p/CRGFaRUDzg_/?utm_medium=copy_link

Post a Comment

0 Comments