Ticker

6/recent/ticker-posts

13 राज्यांतील सर्वेक्षणात मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर



मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार अनेक राजकीय नाट्यानंतर शेवटी सत्तारूढ झाले. परंतू सरकार स्थापन होण्याच्या काही महिन्यांनीच देशात कोरोना महामारीने थैमान घातले. 


या काळात कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाकडून विविध पाऊले उचलण्यात आली. परंतू इतर मोठी कामे मात्र कोरोनामुळे अपुरी राहीली. 


या काळात विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून ठाकरे सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचे गंभीर आरोप देखील केल्या गेले. 


अशातच आता केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. 


प्रश्नम या संस्थेकडून महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला होता. 


सुमारे 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणातील सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे. कोरोना काळात केल्या गेलेल्या या कामावरून जनतेने हा कौल दिला आहे.


जनतेने दिलेल्या या कौलानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देशात नंबर वन ठरले आहेत. तर दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 5 व्या स्थानी आहेत.


यातील 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहे. तर 60 टक्के मतदारांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments