Ticker

6/recent/ticker-posts

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधले सगळ्यांचे लक्ष



मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे उमदा अभिनेते-निर्माते दादा कोंडके हे नाव सर्वांना परिचित आहे. 


परंतू या दिग्गज अभिनेत्याच्या घराची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. याकडे अभिनेता प्रथमेश परब याने सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले आहे.


सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत प्रथमेश परब याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत त्याने, विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांच आहे, असं लिहिलं आहे.


या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे या घराच्या शेअर केलेल्या फोटोवरून दिसून येते. 


पुढे प्रथमेशने म्हटले आहे की, आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर निर्माण केले, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!!


दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे. परंतू रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या दादांच्या वास्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments