Ticker

6/recent/ticker-posts

या वेबसीरीजमधून होणार ईशा देओलची परत एंट्री

From Facebook


मुंबई | बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून ईशा देओल लांब आहे. लग्नानंतर तिने आपला पूर्णवेळ फॅमिलीसाठी दिला होता. परंतू आता ब-याच वर्षाच्या ब्रेकनंतर ती डिजिटल माध्यमातून पून्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार एंट्री करणार आहे. 


त्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा तिला अभिनय क्षेत्रात बघण्याची संधी मिळणार आहे. 


अजय देवगण सोबत ‘रुद्र, द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून ती पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही सीरिज डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 


ब्रिटिश सायकोलॉजिकल थ्रिलर सीरीज, लुथर या क्राईम ड्रामाचा रिमेक म्हणजे ‘रुद्र ,द एज ऑफ डार्कनेस’ ही सीरिज असणार आहे.


जवळ जवळ 15 वर्षानंतर ईशा देओल आणि अजय देवगण एकत्र काम करतांना दिसून येणार आहे. 


बऱ्याच वर्षानंतर अजय देवगणसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तो बऱ्याच चित्रपटांमध्ये माझ्यासाठी उत्तम सहकलाकार होता. एक अभिनेता म्हणून मी त्या प्रोजेक्टवर काम करण्यावर विश्वास ठेवते, जे मला काही नवे शोधू देतील, असे ईशाने म्हटले आहे.


ना तुम जानो ना हम, धूम, काल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ईशाने याआधी काम केले आहे. 




https://twitter.com/taran_adarsh/status/1412974508621721604?s=19

Post a Comment

0 Comments