Ticker

6/recent/ticker-posts

मित्रांनो आत्महत्या करू नका....जीवनात खुप संधी आहेत - पांडुरंग शिंदे

From Pixabay


'आत्महत्या' ही फक्त जो स्वतः चे जीवन संपवतो त्याची नसते, त्या सोबत तो ज्यांच्याशी जोडला गेला आहे जन्माने, प्रेमाने, मैत्रीने त्यांच्या विश्वासाची ती 'हत्या' असते...


विद्यार्थी आत्महत्या हि फार गंभीर स्वरूप धारण केलेली समस्या आहे. त्यात आता स्पर्धा परीक्षा देणारे विदयार्थी तरुण सुद्धा आत्महत्येचा पर्याय शोधत असतील तर हि फार मोठी धोक्याची घंटा आहे.


वेळीच यावर चर्चा होणे, त्यातून योग्य तो दिशादर्शक मार्ग शोधून या तरुणांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी योग्य पावले सरकार आणि तूम्ही आम्ही सर्व मिळून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


मूळात स्पर्धा परीक्षा ही एक फक्त परीक्षा असून जगण्यातील एक छोटे पर्व आहे, सर्वस्व नाही, हे विदयार्थी मित्रांनी लक्षात घेऊनच हा मार्ग निवडावा.


  मी सुद्धा एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थीच आहे, आणि विदयार्थी चळवळीतूनच माझ्या सामाजिक, राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे, स्पर्धा परिक्षेतील यश अपयश मी स्वतः अनुभवले आहे, अभ्यास ते अधिकारी असा कित्येक मित्रांचा प्रवास जवळून पहिला आहे, आणि विशेष  जे अधिकारी म्हणून निवडले गेले नाहीत त्या मित्रांची विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यशस्वी वाटचाल सुद्धा बघतो आहे. 


माझा MPSC/UPSC चा जो अनुभव आहे. तो एकंदरीत सकारात्मकच आहे, हा काही वेळा विविध पातळीवर संघर्ष उभा करावा लागला, सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक यशस्वी आंदोलने पुण्यात व राज्यात विविध ठिकाणी करावी लागली, कधीच हार मी मानली नाही,  स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असंघटित होते त्यांना एकत्र आणले आणि त्यांच्या सहकार्यानेच शासनास विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले, आणि आजदेखील असे प्रयत्न चालूच आहेत.


परंतु स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या मनाला चटका लावून गेली, हा निर्णय त्याने नको घ्यायला होता अस सारख वाटत आहे, स्पर्धा परीक्षा आपल्याला जिद्द आणि चिकाटी शिकवते, त्यातील अभ्यास समाजभान देतो, आपण आचार ,विचाराने परिपक्व होत जातो, कोणत्याही संकटास धैर्याने सामोरे जाण्याची हिंमत आपल्यात येत जाते यातून एक संवेदनशील व्यक्तिमत्व घडते, पण आर्थिक विकास कसा करायचा हे मात्र कळत नाही, त्यातून हे प्रकार घडत आहेत असे वाटतय,


  एक लक्षात घेतले पाहिजे निघणारी पदे आणि परीक्षा देणारे उमेदवार यात खुप मोठी तफावत आहे, प्रत्येकालाच यश येईलच याची खात्री नाही, निकाल 0.009% लागतो, मग बाकीच्यांचे काय? त्यांनी काय करावे वर्षानुवर्ष येन उमेदीचा काळ केवळ परीक्षा देण्यात घालवायचा, नक्कीच नाही, आता वेळ आली आहे योग्य नियोजनाची,जबाबदार निर्णय घेन्याची प्रत्येकानं आपापला "प्लॅन बी" तयार ठेवायचा, अभ्यासाला जास्तीत जास्त ३ ते४ वर्षच द्यायची यश आले ठीक, नाही आले अजून ठीक, काही तरी वेगळे आणि मोठे करण्याची आपली धडपड चालूच ठेवायची, खूप क्षेत्र आपल्यासाठी उघडी असतात निवड तेवढी योग्य पाहिजे.


शेवटी एवढंच म्हणेल,

"  जो हो गया उसे सोचा नही करते, जो मिल गया उसे खोया नही करते,

' सफलता' उन्हे हासिल होती है,

जो वक्त ओर हालात पर रोया नही करते.."

------------------

पांडुरंग शिंदे 

युवा प्रदेशाध्यक्ष,

रयत क्रांती संघटना.

महाराष्ट्र राज्य.



Post a Comment

0 Comments