Ticker

6/recent/ticker-posts

करीना कपूरचे नवे पुस्तक प्रकाशित होताच वादाच्या भोवऱ्यात



मुंबई | अभिनेत्री करीना कपूर खान ही बाॅलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. तसेच ती नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 


ती जेवढी सक्रिय असते, तेवढीच ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत देखील असते. नुकतंच तिचे प्रेगनन्सीवर आधारित एक नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 


मात्र हे पुस्तक प्रकाशित होताच, वादाच्या भोव-यात अडकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाॅलीवूड मधील बेबो चांगलीच ट्रोल होत आहे. 


‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ असं या नव्या पुस्तकाचे नाव आहे. मात्र या पुस्तकाविरोधात ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बोर्डाचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी सांगितले आहे.


महत्वाचं म्हणजे, या पुस्तकात करीनाच्या प्रेग्नंसी दरम्यान केल्या गेलेल्या डाएट, व्यायाम आणि स्टाईलबद्दल सांगण्यात आले आहे. एकंदरीतच करीनाने पुस्तकात तिच्या प्रेग्नंसी दरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. 


याशिवाय या पुस्तकात अभ्यासकांकडून अनेक प्रकारच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. 


परंतू ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने या पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे.  या पुस्तकाच्या नावामध्ये बायबल हा उल्लेख केल्याबद्दल एकमताने निषेध करण्यात आला. तसेच तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


https://www.instagram.com/p/CRGVdbUpfPC/?utm_medium=copy_link

Post a Comment

0 Comments