Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातच तयार होतेय नवी भारतीय mRNA कोरोना लस

From Pixabay


पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लोकांच्या मनातील भीती ही कायम आहे. कोरोना पाठोपाठ आलेल्या नवीन विषाणूमुळे अनेक आजारांनी डोके वर काढल्याने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. 


परंतू काही दिवसांपुर्वी शास्त्रज्ञांनी एक नवीन विषाणू विरोधी थेरपी विकसित केली होती. त्यामुळे आता या भयावह असलेल्या कोरोना महामारीला आळा घालणे शक्य होणार आहे.


त्यानंतर आता भारतातही mRNA प्लॅटफॉर्मवर स्वदेशी लस विकसित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील जेनोव्हा फार्मासिटिकल्स mRNA प्लॅटफॉर्मवरील लस कंपनीने या प्रकारची लस विकसित केली असून, या लसीचे पहिल्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक येत आहेत.


HGC019 असे या लसीचे नाव आहे. mRNA प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लसी कोरोना विषाणूवर सर्वांत प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले होते. 


त्यानंतर सर्वत्र या प्रकराच्या लसीच्या चाचण्या करण्यात येत होत्या. उंदरांसह इतर प्राण्यांवर घेतलेल्या या लसीच्या चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. 


लस दिलेल्या प्राण्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी आणि अँटीबॉडी विकसित होण्यासाठी ती हातभार लावते, असं कंपनीने सांगितलं आहे. 


रोगकारक विषाणू किंवा जिवाणूच्याच जनुकीय घटकांचा वापर करून या लसी विकसित केल्या जातात. त्यामुळे या लसी अधिक परिणामकारक असतात.


सध्या ही लस पहिल्या चाचणीत असल्याने या लसीचा वापरासाठी पुढच्या वर्षी परवानगी मिळू शकते.

Post a Comment

0 Comments