Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! 12 वीचे मार्क वाढवून देतो, असं म्हणत विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

From Pixabay


पुणे | माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 12वी मध्ये शिकणा-या विद्यार्थीनीला मार्क वाढवून देतो, असे म्हणत एका पर्यवेक्षकाने या विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 


घडलेल्या या भयावह प्रकाराची माहिती या मुलीने आपल्या पालकांना दिली. पालकांनी या संबंधित पर्यवेक्षकाला चांगलाच धडा शिकविला आहे.


12वीत मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या पर्यवेक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. यामुळे संतापलेल्या पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत, त्याच्या तोंडाला काळे फासले आहे.


अभिजित पवार असं या पर्यवेक्षकाचे नाव असून, पालकांनी त्याची महाविद्यालयापासून धिंड काढत विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Post a Comment

0 Comments