राजस्थान | दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या महामारीने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. मृत्यूचा हा भयावह खेळ अजूनही सुरूच आहे. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे तर अनेक कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना या कोरोनामुळे घडतांना दिसत आहेत.
अशाच एक हृदयद्रावक घटनेने राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. येथील बाडमेर या गावात एका 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. वडिलांवर होणा-या अंतविधी दरम्यान मुलीने जळत्या चितेवर उडी घेतली.
मृत व्यक्तीचे नाव दामोदर दास असून काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली. यामुळे उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू परिस्थिती नाजूक असल्याने उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना त्याच्या लहान मुलीने तिथे येण्याचा हट्ट धरला. यामुळे तिला अंत्यसंस्कारासाठी सोबत नेण्यात आले. मुखाग्नी दिल्या नंतर मात्र तेथील उपस्थितांना धक्काच बसला. मृत व्यक्तीच्या मुलीने सरळ वडिलांच्या चितेवर उडी घेतली, आत्मदाह करण्याचा प्रयत्न केला.
उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत तिला खेचून बाहेर काढले. यामुळे लगेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या दरम्यान ती 70 टक्के भाजल्या गेली. तिची परिस्थिती ही अत्यंत नाजूक स्वरूपाची आहे.
तिने चितेत उडी का घेतली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पोलिस याचा तपास करत आहे.


0 Comments