Ticker

6/recent/ticker-posts

संसर्ग होऊ नये म्हणून घ्या ही खबरदारी......दवाखाना राहील दुर....

Dry Ginger


महामारीच्या या चक्रव्युहात गरीब-श्रीमंत असा प्रत्येक व्यक्ती अडकला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यासाठी धडपडत आहे. साधा सर्दी, खोकला आणि कपडे जरी झाला तरी विचार येतो, आपल्याला संक्रमण तर नसेल झाले ना....


या चिंतेने आणि भीतीने आपलेच शत्रु आपण होत चाललो आहोत. कारण कुठल्या ना कुठल्या अतिआवश्यक कारणाने आपल्याला घराबाहेर पडावेच लागते.


अशा सर्व व्यक्तींसाठी आणि आपल्या कुटूंबातील ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, कोरडा खोकला, कफ, तोंडाची चव गेली असेल, शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असेल, त्या प्रत्येकासाठी हा आर्युर्वेदीक उपाय रामबाण ठरणार आहे. 


परंतू हा उपाय केला म्हणजे आपण पूर्णपणे बरे झालो अथवा दवाखान्यात जाण्याची गरज नाही, असं नाही. तेव्हा जास्त त्रास होत असल्यास घरगुती उपायापेक्षा दवाखान्यात लवकरात लवकर चेकअप करून येणे अधिक योग्य राहील. दवाखान्यात दिलेल्या गोळ्यांमध्ये आणि आयुर्वेदिक उपायामध्ये साधारणपणे अर्धा तासाचे अंतर ठेवा. 


आजचा या उपायासाठी लागणारा सर्वात पहिला घटक म्हणजे ‘जेष्ठमध’. जो सहजासहजी आपल्या घरी अथवा किराणा दुकानात उपलब्ध असतो. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव नाही अशा व्यक्तींनी जेष्ठमधाचे सेवन केल्यास यामुळे आपली गेलेली चव परत येण्यास मदत होते. यासाठी जेष्ठमधाची बारीक पावडर बनवून ठेवणे फायदेशीर ठरेल.


उपायातील दुसरा घटक म्हणजे सुंठ. आयुर्वेदामध्ये याला महाऔषधी म्हटले जाते. सुंठी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटामिन C, व्हिटामिन B, केरोटीन, थायमिन, हे घटक भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपल्या शरीरातील वात, कप नष्ट होतो.


उपायातील तिसरा घटक म्हणजे पिंपळी. आयुर्वेदामध्ये पिंपळी अत्यंत महत्वाची मानली जाते. खोकल्यावर पिंपळी अत्यंत प्रभावी मानली जाते. छातीमधील कफाला पातळ करण्यासाठी पिंपळी खूप महत्त्वाची आहे. 


जेष्ठमध पावडर एक चमचा, सुंठ पावडर चार चमचे, पिंपळी पावडर एक चमचा असे हे तीनही पदार्थ एकत्र करा. हे मिश्रण तयार झाल्यावर एक चमचा मिश्रणात एक चमचा मध टाका. मिश्रण एकजीव करून जेवण केल्यानंतर याचे चाटण करा. अवघ्या काही मिनिटातच घसा मोकळा होऊन कफ कमी होईल.


हा उपाय करतांना पाळावयाचे पथ्य म्हणजे, दुग्धजन्य पदार्थ काही वेळ न खाणे आणि लगेच पाणी न पिणे.

Post a Comment

0 Comments