Ticker

6/recent/ticker-posts

मुलीने केली बापाची हत्या
नागपूर | वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आपल्या वडिलांचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूरमधील हिंगणा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र लेकीने आपल्याच बापाची हत्या केल्याने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 


मृत झालेल्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर असून, पंधरा वर्षांपूर्वी त्याने वंदना नावाच्या एका विवाहित महिलेशी लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीने त्याला सोडून दिल्याने त्याने हे लग्न केले होते. ज्यावेळी वंदनाशी त्याचा विवाह झाला, त्यावेळी तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. 


लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर सावळी बीबी याठिकाणी वंदनासोबत राहत होता. काही दिवसांनी मात्र दोघात वाद होऊ लागल्याने तो वर्धा जिल्ह्यातील खापरी येथे राहायला गेला. पण अधून मधून तो वंदनाला भेटायला सावळी बीबी याठिकाणी येत होता.


भेटायला आल्यानंतर तो वंदनाला आणि सावत्र मुलीला दारू पिऊन नेहमी त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी देखील 11 च्या सुमारास ज्ञानेश्वर नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला. पुन्हा एकदा त्याने 17 वर्षीय सावत्र मुलीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. यावेळी वंदना देखील तिथेच होती. 


परंतू कुणालाही न जुमानता तो त्यांना त्रास देत होता. त्यामुळे पीडित मुलीने बचावासाठी जवळचं पडलेला लाकडी दांडा ज्ञानेश्वरच्या तोंडात खेचून मारला. यात ज्ञानेश्वर प्रचंड जखमी होऊन, बेशुद्ध पडला. जास्त रक्त वाहून गेल्याने, ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.


एका माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरला याआधी चार वर्ष तुरुंगवास झाला होता. त्यानं 2016 मध्ये त्याच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. 


त्यावेळी न्यायालयानं त्याला कलम 376 आणि पोक्सो कायद्यांतर्गत 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतू त्यानंतरही तो सुधारला नसल्याने, त्याची तक्रार करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments