Ticker

6/recent/ticker-posts

पुसदच्या भूमीपुत्राने उभारले भव्यकोविड सेंटर

शरद भाऊ मैंद यांचे सामाजिक दायित्व



पुसदच्या लौकिकाला साजेशे तीन आमदार व एक खासदार लाभले असतांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची दखल घेऊन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष मा शरदभाऊ मैन्द यांनी अवघ्या तीन दिवसात तब्बल १०० खाटांचे रुग्णालय पुसद येथील माहूर रोड स्थित गणोबा मंगलकार्यालय येथे उभारून आपले सामाजिक दायित्व स्वीकारले. सदर बाब अत्यंतकौतुकास्पद असून पुसद परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एरव्ही सुद्धा कुठलाही सामाजिक उपक्रम म्हटला कि आयोजक आदरणीय शरद भाऊ मैंद यांच्याकडे हक्काने जातात आणि भाऊ सुद्धा भरीव मदत करून आयोजकांत उत्साह निर्माण करतात. याचाच परिपाक म्हणून जनता सुद्धा आदरणीय श्री शरद भाऊ मैन्द यांच्याकडे सहकार महर्षी म्हणून पाहतात व त्याच विश्वासाने भाऊंनी पुसद अर्बन बँकेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर विणून एक विश्वासहर्ता निर्माण केली आहे. 

अशा उदारमतवादी दिलदार राजास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!! आणि परत एकदा कोरोनासारख्या महामारीत पुसदकरांना भव्य कोविड सेन्टर उभारून जो मायेचा आपुलकीचा आणि आपलेपणाचा दिलासा दिला त्याबद्दल पुसदकरांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले.
यवतमाळ पुसद.

Post a Comment

0 Comments