Ticker

6/recent/ticker-posts

पुसद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीसाठी, सन्मान चिन्ह प्रदान



जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व 2020 या वर्षाकरिता महाराष्ट्रातील एकूण 799 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालक यांचे कडून सन्मानचिन्ह दि. 30 एप्रिल 2021 रोजी जाहीर झाले. यात यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पुसद शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर दमकोंडवार, पोलीस मुख्यालय यवतमाळ येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देवगिरकर, पोलीस नाईक अतुल मत्ते यांचा समावेश आहे.

राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकाकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.हा सन्मानचिन्ह सोहळा महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते करण्यात येणार होता.

मात्र या वर्षी हा कार्यक्रम आयोजित न झाल्यामुळे कोविडमुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुसद शहर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्याने शहर पोलीस स्टेशनसह वसंतनगर,ग्रामीण पोलीस स्टेशन, खंडाळा पोलीस स्टेशन व त्यांच्या सहकार्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments