Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरित्या दारू विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात




जानेफळ | वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या दारू गाळणा-या व विक्री करणा-या टोळीस बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे. 


सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गोंधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटनांद्रा शिवारातील जगतापी नाल्यामध्ये अशोक सखाराम तेलगोटे व नामदेव रावजी वाते हे दोघंही अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळतात आणि विकतात. तर दुसरीकडे ग्राम देऊळगाव साकर्शा शिवारात उतावळी नदीच्या पात्रात गुलाब मुरलीधर वानखेडे हा इसम देखील अवैधरित्या विक्री करतांना दिसून आला. त्यामुळे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 



दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर अवैध दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यातील पहिल्या घटनेतील दोन आरोपींकडून एकूण 6100/- आणि 6600/- रूपयाची प्लाॅस्टिक कॅन, टिनपत्रे,आणि मोहाची दारू जप्त केली आहे. तर दुस-या घटनेतील आरोपीकडून एकूण 9950/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments