Ticker

6/recent/ticker-posts

यशोमती ठाकूर यांनी अकोल्याच्या ऐवजी आपल्या जिल्ह्यात लक्ष घालावे - निवेदिता चौधरी

यशोमती ठाकूर यांनी केला पत्रकारांचा अपमान-चौधरी



अमरावती- अकोला येथे कोरोना परिस्थितीचा आढावा महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर घेण्यासाठी गेल्या असतांना पत्रकारांशी यशोमती ठाकूर यांनी कॅमेरा हिसकावून गैरवर्तन केले.याघटनेचा निषेध भाजपाच्या  जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे. पत्रकारांच्या प्रश्नचा राग  अनावर झाल्याने जागतिक प्रेस फ्रीडम डे च्या दिवशीच यशोमती ठाकूर यांनी अकोला येथील पत्रकारावर झाप टाकून कॅमेरा हिसकविला.मुळात अमरावती येथे कोरोनाची स्थिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाताच्या बाहेर गेली आहे.
 अकोल्यात परिस्थीचा आढावा घेण्यासाठी बच्चू कडू पालकमंत्री आहेत. असे असतांना अमरावती सोडून अकोल्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्याची गरजच काय हा सुद्धा प्रश्न असून ठाकूर यांनी सवंग प्रसिद्ध लाटण्यासाठी केलेला हा उपद्व्याप आहे असा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला आहे. यशोमतींनी पत्रकारांचा कॅमेरा हिसकावून समस्त पत्रकारांचा अपमान केला आहे. जागरूक पत्रकारांनी याचा निषेध नोंदविणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments