Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना मुळे मृत्यू झालेल्या सर्कल प्रमुखाच्या कुटुंबाला आमदार नितीन देशमुख यांच्या कडून 2 लाखांची मदत



अकोला -जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील उगवा येथील शिवसेनेचे 35 वर्षीय युवा सर्कल प्रमुख गणेश कोरडे यांचा 30 मार्च ला कोरणा मुळे मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले अशावेळी या कुटुंबाला कुटुंबप्रमुख म्हणून साथ देत मानसिक आधार व कोरडे परिवाराला दोन लाख रुपयांची मदत करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख कुटुंबाची भेट घेताना भावुक झाले होते.

एक शिवसैनिक आपल्यातून निघून गेला हे दुःख फार मोठं असतं त्यामुळे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे हे मी माझे कर्तव्य समजतो हा संदेश देत आमदार नितीन देशमुख यांनी या परिवाराला केलेले सहकार्य कुणीही विसरू शकत नाही यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तसेच शिवसेनेचे विकास पागृत , अविनाश गावंडे, प्रदीप बनारसे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments