Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमात तरुणीच्या नकाराने घडला धक्कादायक प्रकार

Love Triangle


नवी दिल्ली | प्रेमासाठी वाट्टेल ते करायची अनेकांची तयारी असते. पण वाट्टेल ते करूनही कधी कधी प्रेम मिळवणं जेव्हा कठीण होतं, तेव्हा भलतंच काहीतरी घडून जातं. 


अश्या अनेक घटना आपण आपल्या आयुष्यात ऐकल्या किंवा बघितल्या असतील. अशीच एक घटना नुकतीच पाकिस्तानमध्ये घडली आहे. 


या दुर्दैवी घटनेत तरूणीने प्रेमाचा स्वीकार न केल्याने तीची हत्या करण्यात आली आहे. माहिरा जुल्फिकार असे त्या तरूणीचे नाव आहे. ती 26 वर्षाची एक ब्रिटीश विद्यार्थीनी होती. लंडनमध्ये ती कायद्याचं शिक्षण घेत होती.


माहिरा ही आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी काही दिवसांपुर्वी पाकिस्तानला आली होती. लग्न सोहळा आटपून लंडनला गेल्यानंतर आपल्याला होम क्वारंटाईन व्हावं लागेल, ज्यामध्ये आपले जास्त पैसे जातील, या विचाराने माहिरा मैत्रिणीच्या लग्नानंतर काही दिवस पाकिस्तानमध्येच राहत होती.


याच दरम्यान तेथील स्थानिक असलेल्या दोन गुंड तिच्या प्रेमात पडले. ते दोघेही तिला लग्नासाठी तगादा लावू लागले. मात्र तीचे या दोघांपैकी कुणावरही प्रेम नसल्याने तीने दोघांनाही लग्नासाठी नकार दिला. परंतू ते दोघेही तिने नकार दिल्याने तिला त्रास देऊ लागले. 


याच रागातून सोमवारी सकाळी 4 हल्लेखोरांनी माहिराच्या बेडरूममध्ये शिरून गोळ्या झाडून तीची निर्घुणपणे हत्या केली.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधीत आरोपी तरुणीला त्रास देत असतांना, तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले.

Post a Comment

0 Comments