Ticker

6/recent/ticker-posts

एकाच वेळी ८७ ठिकाणी रेड मारणा-या ‘या’ अधिकाऱ्याबद्दल तुम्ही वाचलं का?




देशात आयर्नमॅन म्हणून विशेष ओळख असलेले आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त असलेले कृष्ण प्रकाश यांच्या कार्याचे अनेकदा कौतुक झाले आहे. 


1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कृष्ण प्रकाश यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. त्यांनी नष्ट केलेल्या गुन्हेगारीची दूरवर चर्चा आहे.


2012 मध्ये त्यांची मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली होती. त्यांनी महाराष्ट्रातील लॉटरी बंद करण्याची कारवाई करत, नांदेड जिल्ह्यातील लॉटरीविरोधात कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामुळे सरकारला लॉटरी ऑनलाइन बंद करावी लागली. 


कापूस आणि टोकन सिस्टीम घोटाळा त्यांच्या नेतृत्वात उघडकीस आला. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या जनतेची अटकही त्यांनी चुकवली नाही. निडरपणे सेवाकार्य करण्याच्या त्यांच्या या कृतीने अण्णा हजारे देखील प्रभावित झाले. 


जंगलातील अवैध लाकूड तोडणे आणि चोरीप्रकरणी केलेल्या चौकशी दरम्यान वन विभागाचे अधिकारी या गुन्ह्यात असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांनी अनेक अधिक-यांना अटक केली. यावेळी अण्णा हजारे यांनी त्यांना अमरावती मध्ये येऊन पाठिंबा दिला.


बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असतांना कृष्ण प्रकाश यांनी अवैध वाहतूक करणा-यांना चांगलाच चोप दिला. काळीपिवळीत जेथे ८ प्रवाश्यांची क्षमता आहे, तेथे १४ ते १५ लोकांना नेल्या जाई. याविरोधात त्यांनी कडक कारवाई केली होती . लॉटरी चा मुद्दा राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत असतांना, बुलढाणा जिल्ह्यात एकाच वेळी ८७ पथके गठीत करून, ८७ ठिकाणी एकाचवेळी लॉटरी रेड मारली. यादरम्यान, सरकारच्या लॉटरी कार्यालयातही विशेष कारवाई करण्यात आली.


अहमदनगर जिल्ह्यात एसपी म्हणून कर्तव्यावर असतांना एका दिवसात एकूण २९ लाख लिटर दुधाचे उत्पादन त्यांनी जप्त केले होते. त्यापैकी नऊ लाख लिटर दुध हे बनावट होते.


त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, सांगलीचा परिसर हिरवा गार ठेवल्याबद्दल हरित पुरस्कार, चित्रलेखा या अधिकृत नियतकालिकाच्या वतीने सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्याचा सन्मान, महात्मा गांधी शांतता पुरस्कार अश्या नानाविध आणि नामांकित पुरस्कारांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments