Ticker

6/recent/ticker-posts

जांभई देणे हा आळस नव्हे...ही तर आरोग्याची देण...



जांभया देणं म्हणजे आळस देणं, असं आपण बरेचदा म्हणत असतो आणि ऐकत असतो. आचरणाच्या दृष्टीने विचार केला, तर कुणासमोर किंवा एखादे काम करत असतांना अचानक आलेली जांभई ही असभ्यपणाचे लक्षण मानल्या जाते. 


जांभया देणं हे संसर्गजन्य असलं, म्हणजे एकाने दिली की दुसऱ्या व्यक्तीला जांभई येतेच. कधी कधी तर जांभई हा शब्द उच्चारल्या बरोबर आपल्याला ती येणे सुरू होते. हा शब्द ही आपल्याला कंटाळवाणा वाटू लागतो.



जन्म झाल्यानंतर अकराव्या व्या आठवड्यापासून आपण जांभई देतो असं म्हटल्या जाते. दुसऱ्याने दिलेली जांभई बघून वयाच्या पाचव्या वर्षापासून ती द्यायला सुरुवात होते. 


पण ही जांभई देतांना एक गोष्ट मात्र नक्की होते. यामुळे आपल्या तोंडातून आ असा आवाज येतो. जबडा हा खाली येतो, भरपूर हवा शरीरात जाते, छाती भरून श्वास घेतला जातो.


आपण ऑफिसमध्ये असलो, बाहेर असलो, फिरायला गेलो असलो, कॉलेजमध्ये असलो किंवा कुठेही असलो तरी जांभई ही येतेच. परंतु ही जांभई जर आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, असे कोणी सांगितले तर.....


कदाचित आपला यावर विश्वास बसणार नाही. एखाद्या व्यक्तीने जांभळी दिली म्हणजे तो आळस देतो आहे, असा समज अनेकांमध्ये आहे. पण खरे पाहता जांभई दिल्याने आपल्या शरीरातील आळस दूर होऊन भरपूर हवा शरीरात घेतल्या जाते.


याच्या फायद्यांचा विचार केला तर, 

यामुळे मेंदूला मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो. जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात जाते. यामुळे रक्तप्रवाह सुधारल्या जातो आणि मेंदू फ्रेश होतो. मेंदूची मानसिक क्षमता ही वाढते.


कॉफी घेतल्यावर जसा तर तरतरेपणा आपल्या अंगात येतो. तसंच काहीसं जांभई दिल्याने होते. यामुळे शरीरातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड ची पातळी कमी होऊन ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. 


एखाद्या व्यक्तीच्या कानात वेदना असतील किंवा कर्णकर्कश आवाजाने कानात दडे बसले असेल तर ते मोकळे होऊन वेदना कमी झाल्यासारख्या वाटतात.


कधीकधी एकच एक काम करून आपल्याला कंटाळा येतो, अश्यावेळी जर आपल्याला जांभई येत असेल तर कामाच्या पद्धतीत बदल करणे कधीही चांगले ठरते.


हेच जांभई येण्याचं कारण असू शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर थोडावेळ विश्रांती घ्या किंवा आराम करा असं म्हणणे चुकीचं ठरणार नाही.

Post a Comment

0 Comments