Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

केंद्र सरकारने केली मोठी घोषणा..

Corona Yoddha


मुंबई | कोरोना महामारीच्या या काळात आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणा-या कोरोना योद्धांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोरोना योद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


मागीलवर्षात उद्रेक झालेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणा-या कोरोनायोद्ध्यांना केंद्र सरकारतर्फे 50 लाखांचं विमा संरक्षण देण्यात आलं होतं. 


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांठी हे संरक्षण देण्यात आले होते. या योजनेच्या प्रीमियमची रक्कम ही केंद्र सरकारकडूनच भरली जाणार, असल्याचे सांगण्यात आलं होतं. 30 मार्च 2020 ला केंद्र सरकारने हा निर्णय घोषित केला होता. 



दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या या योजनेची मुदत ही 20 मार्च 2021 ला संपली होती. कोरोना योद्ध्यांची व्यथा लक्षात घेता केंद्र सरकारने 24 एप्रिलपर्यंत येणारे सर्व क्लेम स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारला केले. परंतु, मुदतवाढ नसल्याने आरोग्य सेवकांची गैरसोय होत होती. याच पार्श्वभूमीवर कोरोना योद्ध्यांना आणखी 180 दिवसांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


या योजनेचा महाराष्ट्रातील एकूण 40 हजार कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार आहे. यापूर्वी या योजनेद्वारे तब्बल 59 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये विम्याची रक्कम बहाल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments